शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

तलाठीला पुन्हा लाच भोवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शेतजमिनीच्या उतारावर वडिलांच्या लावलेल्या नावात दुरुस्ती करण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच स्वीकारतांना खांडबारा, ता.नवापूर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : शेतजमिनीच्या उतारावर वडिलांच्या लावलेल्या नावात दुरुस्ती करण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच स्वीकारतांना खांडबारा, ता.नवापूर येथील तलाठी यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे रंगेहाथ अटक करण्यात आली. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वीदेखील याच तलाठीस नंदुरबार येथील तलाठी कार्यालयात लाच घेताना पकडले होते.

जयसिंग गुंजाऱ्या पावरा, तलाठी, देवमोगरा, सजा खांडबारा असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. नवापूर येथील शेतकरी यांचे डोगेगाव, ता.नवापूर शिवारात शेत आहे. त्या शेताच्या सातबारावर संबंधित शेतकऱ्याच्या वडिलांचे नाव होते. त्यात दुरुस्ती करण्यासाठी तलाठीने दीड हजार रुपयांची मागणी केली. याबाबत शेतकरी यांनी नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

ठरल्याप्रमाणे खांडबारा येथील मंडळ अधिकारी कार्यालयात पैसे देण्याचे ठरले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला होता. दीड हजार रुपये घेताना तलाठी पावरा यांना रंगेहाथ अटक करण्यात आली.

विशेष म्हणजे १२ मार्च २०१८ रोजी जयसिंग पावरा यांना नंदुरबार येथील तलाठी कार्यालयात लाच घेताना अटक करण्यात आली होती. त्यांना निलंबित केले गेले होते. कर्तव्यावर हजर झाल्यानंतर पुन्हा जयसिंग पावरा यांनी लाच घेतली आणि जाळ्यात अडकले.

याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.