शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
3
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
4
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
5
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
6
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
7
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
8
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
9
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
10
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
11
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
12
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
13
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
18
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
19
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
20
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
Daily Top 2Weekly Top 5

दामळदा येथील संशयित रुग्णाचे स्वॅब घेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 12:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील दामळदा येथील एका युवकाला कोरोनाची लक्षणे जाणवल्याने त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले असून आठ ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील दामळदा येथील एका युवकाला कोरोनाची लक्षणे जाणवल्याने त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले असून आठ जणांना शहादा येथील विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. गावात तीन दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी घेतला आहे.दामळदा येथील एका युवकाला श्वास घेण्यास त्रास जाणवत असल्याने उपसरपंच डॉ.विजय चौधरी यांनी आरोग्य यंत्रणेला कळवून या युवकाला रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी पाठवून त्याचे स्वॅब नमुने घेण्यात आले. तर आठ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या युवकाच्या स्वॅबचे अहवाल येण्याअगोदरच ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी एकत्रित येऊन खबरदारीचा उपाय म्हणून गावातून कोणत्याही नागरिकांना बाहेर जाता येणार नाही व बाहेरील नागरिकांना गावात प्रवेश बंद केला आहे. खबरदारी म्हणून ग्रामपंचायतीने जनता कर्फ्यू लावून ग्रामस्थांना घरीच राहण्याचे आवाहन केले आहे. मास्क न लावणाऱ्या व्यक्तींना ग्रामपंचायतीतर्फे ५०० रुपयांचा दंड जागेवरच आकारण्यात येणार आहे. गावात लागलीच फवारणी करण्यात आली असून उपसरपंच डॉ.विजय चौधरी, पं.स. सदस्या विद्या चौधरी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपाययोजना करीत आहेत.डामरखेडा, ता.शहादा येथेही एक युवक पॉझिटीव्ह आढळल्याने गावात लॉकडाऊन पाळण्यात आला आहे. हा युवक अंकलेश्वर येथून कारने परत येत असताना अचानक त्रास सुरू झाला. त्यात कारचा अपघात होऊन तो गंभीर जखमी झाल्याने त्याला सुरत येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्या स्वॅबचे नमुने घेऊन तपासणी केली असता तो कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले. त्याच्यावर तेथेच शस्त्रक्रिया करण्यात आली. त्या वेळी युवकाची पत्नी सोबत होती. त्यानंतर युवकाची पत्नी डामरखेडा येथे आली व मुलगा आणि सासूला घेऊन सुरत येथे गेली. हा युवक वास्तव्यास असलेला परिसर सील करण्यात आला असून ग्रामपंचायतीमार्फत औषध फवारणी करण्यात आली. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र पेंढारकर यांनी डामरखेडा येथे भेट देऊन सुरत येथे उपचार घेत असलेल्या युवकाच्या संपर्कातील व्यक्तींना विलगीकरण कक्षात दाखल केले आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ग्रामीण भागातही पोहोचला आहे. जनतेचे आरोग्य सुरक्षित रहावे, नागरिकांना मानसिक त्रास होऊ नये म्हणून दामळदा ग्रामपंचायतीने तीन दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये तसेच गावात विना मास्क फिरणाºया व्यक्तीला ५०० रुपये दंड आकारणी करण्यात येणार आहे.-डॉ.विजय चौधरी,उपसरपंच, दामळदा, ता.शहादा.दामळदा गावात कोरोना विषाणूची लागण झाल्याची लक्षणे आढळून आलेला एक संशयित रुग्ण आढळून आल्याने नागरिकांच्या सुरक्षेकरिता गावात औषध फवारणी करण्यात आली आहे. या विषाणूच्या संसर्गापासून दूर राहण्यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगसह नियमांचे पालन करावे.-विद्या चौधरी,सदस्या, पंचायत समिती, शहादा.