सुरतच्या व्यापाऱ्यांकडून नंदुरबारच्या उद्योजकाची २२ लाखात फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:59 IST2021-02-21T04:59:29+5:302021-02-21T04:59:29+5:30

नंदुरबार : सरकी ढेप खरेदी करून त्याचे २२ लाख ५५ हजार रुपये न देता नंदुरबारातील उद्योजकाची सुरत येथील व्यापाऱ्याने ...

Surat traders defraud Nandurbar businessman for Rs 22 lakh | सुरतच्या व्यापाऱ्यांकडून नंदुरबारच्या उद्योजकाची २२ लाखात फसवणूक

सुरतच्या व्यापाऱ्यांकडून नंदुरबारच्या उद्योजकाची २२ लाखात फसवणूक

नंदुरबार : सरकी ढेप खरेदी करून त्याचे २२ लाख ५५ हजार रुपये न देता नंदुरबारातील उद्योजकाची सुरत येथील व्यापाऱ्याने फसवणूक केल्याची घटना घडली. याबाबत सुरत येथील जिग्नेश भिकुभाई जरीवाल व धवल पटेल यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदुरबार येथील संजय सुरेशचंद्र अग्रवाल यांच्या श्रीकृष्ण ॲग्रो कारखान्यातून २२ लाख ५५ हजार रुपयांची ढेप १५ ते २५ डिसेंबर २०२० दरम्यान खरेदी केली होती. दीड ते दोन महिने झाले तरी व्यापारी जरीवाल व पटेल यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. आपण फसविले गेल्याचे लक्षात आल्यावर संजय अग्रवाल यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी जिग्नेश जरीवाल व धवल पटेल यांच्याविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक धनराज निळे करीत आहे.

Web Title: Surat traders defraud Nandurbar businessman for Rs 22 lakh