नंदुरबार व शहादा येथे आधारभूत धान्य खरेदी केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 11:47 AM2020-01-21T11:47:59+5:302020-01-21T11:48:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आधारभूत धान्य खरेदी योजनेअंतर्गत तूर खरेदी केंद्र नंदुरबार व शहादा येथे सुरू करण्यात येत ...

Support grain procurement centers at Nandurbar and Shahada | नंदुरबार व शहादा येथे आधारभूत धान्य खरेदी केंद्र

नंदुरबार व शहादा येथे आधारभूत धान्य खरेदी केंद्र

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आधारभूत धान्य खरेदी योजनेअंतर्गत तूर खरेदी केंद्र नंदुरबार व शहादा येथे सुरू करण्यात येत आहे. तूरसाठी हमी भाव ५,८०० रुपये क्विंटल इतका आहे.
खरीप हंगामासाठी केंद्र सरकारने आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत तूर खरेदीसाठी नाफेड व भारतीय अन्न महामंडळाची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यानुसार राज्यात पणन महासंघामार्फत तूर खरेदी करण्यात येणार आहे. तूरचे (एफएक्यू) दर प्रतिक्विंटल रुपये पाच हजार ८०० असा राहील. पणन महासंघामार्फत तूर नोंदणीचा कालावधी १४ फेब्रुवारी पर्यंत राहील. शेतकऱ्यांनी शेतकरी सहकारी संघ नंदुरबार, शहादा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ शहादा येथील व्यवस्थापकांकडे संपर्क साधावा.
शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी आॅनलाईन पीकपेरा नमूद असलेला सातबारा उताºयाची मूळ प्रत, आधार कार्डची झेरॉक्स, बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, मोबाईल क्रमांक आदींची माहिती वरिल ठिकाणी द्यावी.
नोंदणी झाल्यानंतर शेतकºयांना नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे शेतमाल घेवून येण्याची तारीख कळविण्यात येणार आहे.

Web Title: Support grain procurement centers at Nandurbar and Shahada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.