उन्हाळी कांद्याने केली शेतक:यांची निराशा

By Admin | Updated: April 20, 2017 11:05 IST2017-04-20T11:05:16+5:302017-04-20T11:05:16+5:30

मजुरीखर्च निघत नाही : भाव नसल्याने शेतकरी चिंतेत, वैंदाणेसह परिसरातील स्थिती

Summer onion farmers: their disappointment | उन्हाळी कांद्याने केली शेतक:यांची निराशा

उन्हाळी कांद्याने केली शेतक:यांची निराशा

 वैंदाणे,दि.20- नंदुरबार तालुक्यातील वैंदाणेसह परिसरात उन्हाळी कांदा काढण्याचे काम सुरू झाले आह़े मात्र योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्गाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े

कांद्याला केवळ तीन ते चार रुपये किलो भाव मिळत असल्याने शेतकरी हा कांदा शेतातच पडू देत आह़े दरम्यान, दुसरीकडे मजुरांची टंचाई जाणवत असल्याने परिणामी बाहेर गावातील मजुरांना शेतीकामांसाठी आणले जात आह़े उत्पन्नाचा खर्चही निघणे अवघड झाले असताना मजुरीचा भार शेतक:यांना पेलावा लागत आह़े यामुळे शेतक:यांची सर्व आर्थिक गणिते कोलमडली आह़े पावसाळी कांद्याचीही भावाअभावी वाईट अवस्था होती़ तरीही भाव चांगला मिळेल या आशेवर बहुसंख्य शेतक:यांनी उन्हाळी कांद्याची लागवड केली होती़ मात्र लागलेला खर्चही निघत नसल्याने शेतक:यांच्या अडचणीत अधिकच वाढ होत आह़े 
(वार्ताहर)

Web Title: Summer onion farmers: their disappointment