मद्याच्या नशेत गळफास घेत म्हाडा कॉलनीतील एकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 12:33 IST2019-12-25T12:33:13+5:302019-12-25T12:33:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील म्हाडा कॉलनीत गळफास घेत एकाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी तीन वाजता उघडकीस ...

Suicide in Mhada colony after being drunk | मद्याच्या नशेत गळफास घेत म्हाडा कॉलनीतील एकाची आत्महत्या

मद्याच्या नशेत गळफास घेत म्हाडा कॉलनीतील एकाची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील म्हाडा कॉलनीत गळफास घेत एकाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी तीन वाजता उघडकीस आली़ मद्याच्या नशेत ही आत्महत्या केल्याची माहिती आहे़
सुनिल विठ्ठल वसईकर (४२) असे मयताचे नाव आहे़ मंगळवारी दुपारी घरी एकटा असताना सुनिल वसईकर याने आत्महत्या केली़ मयत वसईकर यास सात वर्षांपासून मद्याचे व्यसन होते़ यातून नैराश्य आल्याने त्याने आत्महत्या केल्याची माहिती देण्यात आली आहे़ याबाबत उषाबाई वाघ यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

Web Title: Suicide in Mhada colony after being drunk