लांबलेल्या पावसामुळे साखर हंगामही लांबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:33 PM2019-11-12T12:33:56+5:302019-11-12T12:34:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लांबलेला पाऊस आणि ऊसाची कमतरता यामुळे यंदा साखर हंगाम लांबण्याची शक्यता आहे. शासनाने आधीच ...

The sugar season was also prolonged by prolonged rains | लांबलेल्या पावसामुळे साखर हंगामही लांबला

लांबलेल्या पावसामुळे साखर हंगामही लांबला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लांबलेला पाऊस आणि ऊसाची कमतरता यामुळे यंदा साखर हंगाम लांबण्याची शक्यता आहे. शासनाने आधीच 1 डिसेंबरनंतर कारखाने सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत. दरम्यान, यंदा ऊसाची कमतरता असल्यामुळे ऊस पळवापळवीला जोर येण्याची शक्यता आहे. 
दरवर्षी साखर हंगामाला  नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुस:या आठवडय़ापासून सुरुवात होते. मुबलक प्रमाणात ऊस उपलब्ध राहिल्यास हंगाम मार्च, एप्रिल महिन्यार्पयत सुरू असतो. यंदाची नैसर्गिक स्थिती लक्षात घेता आणि उपलब्ध ऊस पहाता हंगाम उशीराने सुरू होऊन लवकर बंद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे असले तरी जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखान्यांनी गाळप हंगामाची तयारी पुर्ण केली आहे. येत्या आठ ते दहा दिवसात औपचारिक शुभारंभ होऊन प्रत्यक्षात डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ापासून गाळपाला सुरुवात होणार आहे. 
पावसाळा लांबल्याने उशीरा..
यंदा पावसाळा लांबला, नोव्हेंबर महिन्याच्या दुस:या आठवडय़ार्पयत अवकाळी पाऊस देखील राहिला. यामुळे यंदा साखर कारखाने सुरू होण्यास विलंब होणार हे स्पष्टच   होते. त्यातच राज्यातील राजकीय अस्थिरता  देखील कारणीभूत ठरली आहे. 
पावसामुळे शेत, शिवारात अजूनही ओल आहे. त्यामुळे ऊस तोडणी करणे, वाहने शेत शिवारातील रस्त्यांवरून नेणे आणि वाहतूक     करणे ही बाब मोठी दिव्याची ठरणार आहे. अनेक भागातील नाले अजूनही प्रवाही आहेत. शेतशिवारातील रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे ऊस वाहतुकीची मोठी डोकेदुखी यंदा राहण्याची शक्यता आहे. 
1 डिसेंबरनंतरच सुरू
यंदाचा साखर हंगाम 1 डिसेंबर नंतरच सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. दरवर्षी साधारणत: 20 नोव्हेंबरनंतर साखर हंगाम सुरू होत असतो. यंदा ऊसाची कमतरता आणि इतर कारणांमुळे 1 डिसेंबरनंतर साखर कारखाने सुरू करण्यात येणार आहेत. असे असले तरी शुभमूहर्त पाहून 1 डिसेंबरच्या आत देखील गाळप हंगामाचा शुभारंभ करता येणार आहे. परंतु प्रत्यक्षात गाळप 1 डिसेंबरनंतर होणार आहे. या दृष्टीने जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखान्यांची नियोजन करून ठेवले आहे. 15 ते 25 नोव्हेंबर दरम्यान गाळप हंगामाचा औपचारिक शुभारंभ जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखाने करण्याची शक्यता आहे.
ऊसाची कमरता..
गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे ऊस लागवड कमी झाली होती. त्याचा फटका यंदा साखर हंगामाला बसणार आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा निम्मे क्षेत्रात देखील ऊस नसल्याचे चित्र आहे. साधारणत: 28 ते 30 हजार एकरावर ऊस उपलब्ध असल्याचे चित्र आहे. तिन्ही साखर कारखान्यांची गाळप क्षमता  लक्षता घेता हा ऊस पूरेसा नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे यंदा ऊस पळवापळवीचे संकट कारखान्यांसमोर राहणार आहे. गेल्या वर्षी ऊस क्षेत्र मोठय़ा प्रमाणावर होते. त्यामुळे मार्च, एप्रिलर्पयत साखर कारखाने सुरू राहिले होते. यंदा परिस्थिती याउलट आहे.
दराबाबत उत्सूकता
ऊस दराबाबत आता शेतक:यांमध्ये उत्सूकता आहे. शासनाचा एफआरपी आणि त्याउपर कारखाने किती भाव देऊ शकतात याकडे ऊस उत्पादक शेतक:यांचे लक्ष लागून आहे. 


जिल्ह्यात सातपुडा साखर कारखाना व आदिवासी सहकारी साखर कारखाना हे सहकार तत्वावरील कारखाने तर आयन शुगर लिमिटेड हा खाजगी तत्वावरील साखर कारखाना आहे. या कारखान्यांनी ऊसतोड मजुर आणण्यासाठी मराठवाडासह राज्यातील विविध भागात आपले अधिकारी पाठविलेले आहेत. मजुर व त्यांचे मुकाडदम यांना आगावू रक्कमम देवून त्यांना कारखाना कार्यस्थळी आणावे लागते.  संबधीत अधिकारी गेल्या आठ ते दहा दिवसांपासून संबधीत भागात तळ ठोकून आहेत. परंतु पाऊस लांबल्याने मजुर निघत नसल्यची स्थिती आहे. 
 

Web Title: The sugar season was also prolonged by prolonged rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.