परीक्षा केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांची अचानक भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 13:00 IST2020-03-07T13:00:30+5:302020-03-07T13:00:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी शहरातील दहावीच्या परीक्षा केंद्रांना अचानक भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी ...

Sudden visit of collectors to examination centers | परीक्षा केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांची अचानक भेट

परीक्षा केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांची अचानक भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी शहरातील दहावीच्या परीक्षा केंद्रांना अचानक भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली.
दहावीचा हिंदी विषयाची परीक्षा सुरू असताना डॉ.भारूड यांनी डी.आर. हायस्कूल आणि यशवंत विद्यालय या दोन केंद्रांना अचानक भेट दिली. त्यांनी तेथील सुरक्षा व्यवस्थेची व परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. परीक्षेतील गैरप्रकारांना सहकार्य करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात यावे. असे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले. कॉपीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत बाधा येत असल्याने असे प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने यावर्षी कठोर उपाय केले आहेत. येत्या काळात प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी अचानकपणे जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांना भेट देणार असून तेथे गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही डॉ.भारूड यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी अशा प्रकारांपासून दूर रहावे व अभ्यासावर लक्ष केंद्रीत करून चांगले यश संपादन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Web Title: Sudden visit of collectors to examination centers