अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनासाठी अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:29 IST2021-04-15T04:29:20+5:302021-04-15T04:29:20+5:30

पात्र लाभार्थ्यांना मंजूर मापदंडानुसार येणाऱ्या खर्चापैकी कमाल ५५ टक्के अनुदान प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रती थेंब अधिक पीक योजनेतून ...

Subsidy for micro irrigation to Scheduled Tribe farmers | अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनासाठी अनुदान

अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनासाठी अनुदान

पात्र लाभार्थ्यांना मंजूर मापदंडानुसार येणाऱ्या खर्चापैकी कमाल ५५ टक्के अनुदान प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रती थेंब अधिक पीक योजनेतून आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या तरतुदीमधून ३५ टक्के असे दोन्ही योजनांच्या माध्यमातून ९० टक्के अनुदान निधी उपलब्धतेनुसार देण्यात येईल. ठिबक सिंचनासाठी कमाल रुपये ५० हजार व तुषार सिंचन संचासाठी कमाल रुपये २५ हजार मर्यादेपर्यंत अनुदान असेल. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत पात्र नसलेल्या आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत अर्ज केलेल्या अनुसूचित जमातीचे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन संचासाठी मंजूर मापदंडानुसार येणाऱ्या खर्चापैकी कमाल ४५ टक्के अनुदान प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रति थेंब अधिक पीक योजनेतून आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या तरतुदीमधून ४५ टक्के असे दोन्ही योजनांच्या माध्यमातून ९० टक्के अनुदान निधीच्या उपलब्धतेनुसार देण्यात येईल. ठिबक सिंचनासाठी कमाल रुपये ५० हजार व तुषार सिंचन संचासाठी कमाल रुपये २५ हजार मर्यादेपर्यंत अनुदान असेल. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचन या बाबींचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना प्रथम प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रती थेंब अधिक पीक योजनेतून लाभ घेणे अपेक्षित आहे. या योजनेतून फक्त टॉपअपसाठी अनुदान देण्यात येईल. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदुरबार, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार तसेच तालुका कृषी कार्यालय व पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांनी कळविले आहे.

Web Title: Subsidy for micro irrigation to Scheduled Tribe farmers