उपनगराध्यक्षांच्या पतीची पालिकेच्या लिपिकास शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 12:20 IST2020-01-22T12:20:26+5:302020-01-22T12:20:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यास मोबाइर्लवर संपर्क करुन शिविगाळ केल्याप्रकरणी तळोदा पालिका उपनगराध्यक्षांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल झाला ...

Sub-clergyman's husband's clerical clergyman abducted | उपनगराध्यक्षांच्या पतीची पालिकेच्या लिपिकास शिवीगाळ

उपनगराध्यक्षांच्या पतीची पालिकेच्या लिपिकास शिवीगाळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यास मोबाइर्लवर संपर्क करुन शिविगाळ केल्याप्रकरणी तळोदा पालिका उपनगराध्यक्षांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे़ सोमवारी सायंकाळी त्यांनी शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती़
उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी यांचे पती योगेश प्रभाकर चौधरी यांनी पालिका कर्मचारी नारायण बन्सीलाल चौधरी यांना खाजगी कामासाठी घरी बोलावले होते़ परंतू नारायण चौधरी हे जावू शकले नव्हते याचा राग येऊन सोमवारी सायंकाळी योगेश चौधरी यांनी लिपिक चौधरी यांना फोन लावून शिवीगाळ करत पाईपने मारेन व तलवारीने कापून काढेल अशी धमकी दिली़ या प्रकाराने भयभीत झालेले नारायण चौधरी यांनी थेट पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली़ त्यांच्या फिर्यादीवरुन संशयित योगेश प्रभाकर चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल असून तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करत आहेत़
दरम्यान घडलेल्या प्रकारानंतर तळोदा येथील पालिका कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करत घटनेचा निषेध केला़

Web Title: Sub-clergyman's husband's clerical clergyman abducted