शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

सूर्यग्रहण पाहण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 12:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी गुरुवारी कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद घेतला. सूर्यग्रहण पाहण्यासाठी शाळा, सामाजिक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी गुरुवारी कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद घेतला. सूर्यग्रहण पाहण्यासाठी शाळा, सामाजिक संघटना व स्वयंसेवी संस्था-संघटनांनी सौर चष्मे उपलब्ध करून दिले होते.डॉ.काणे गर्ल्स हायस्कूल, नंदुरबारनंदुरबार येथील डॉ.काणे गर्ल्स हायस्कूलमध्ये सूर्यग्रहणाविषयी विद्यार्थिनींना सखोल माहिती देण्यात आली. या वेळी मुख्याध्यापिका भारती सूर्यवंशी, पर्यवेक्षक नारायण भदाणे उपस्थित होते. दरम्यान भुगोल शिक्षक शांताराम पाटील यांनी विद्यार्थ्यांना सूर्यग्रहणही खगोलीय घटना असून, त्याचा शुभ-अशुभ घटनेशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले. या वेळी शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.ईरा किड्स स्कूल, मोलगीमोलगी, ता.अक्कलकुवा येथीलमोलगी, ता.अक्कलकुवा येथील ईरा किड्‘ व इंटरनॅशनल स्कूलमध्ये ख्रिसमस उत्साहात साजरा करण्यात आली. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन शीत वसावे होते. प्रारंभी त्यांच्या हस्ते दीपप्रज्वालन करण्यात आले. या वेळी शाफीन पिंजारी, आदित्य वळवी, रिषभ किशोर जैन या विद्यार्थ्यांनी सान्टाक्लॉजचा पोषाख परिधान करून विद्यार्थ्यांना हसविले. कार्यक्रमास प्राचार्य गोटूसिंग वळवी, उत्तमसिंग वळवी हिराबाई वळवी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनंदा वसावे यांनी केले.प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन, नंदुरबारनंदुरबार तालुक्यातील अजेपूर व हरिपूर येथील विद्यार्थ्यांना सूर्यग्रहण पाहण्यासाठी प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे सोलर चष्म्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनी सोलर चष्मे लावून सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद लुटला. कार्यक्रमास गावातील सरपंच व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी प्रथमचे गणेश पाटील, तालुका प्रमुख हेमलता तांबोळी, अलका पाटील, अजय इंगळे, मंगेश ढगे, चंदा गवळी उपस्थित होते.कॉ.बी.टी.आर. हायस्कूल, मोडतळोदा तालुक्यातील मोड येथील कॉ.बी.टी.आर. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सूर्यग्रहणाची प्रतिकृती बनवून अनोख्या पद्धतीने सूर्यग्रहणाचा आनंद लुटला. सूर्यग्रहण सुरक्षितपणे पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना चष्मे उपलब्ध करून देण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांनी सूर्याच्या ऊन-सावलीच्या खेळ उत्सव रुपात म्हणजेच सूर्योत्सवाचा अनुभव घेत दिवस साजरा केला. सूत्रसंचालन फुंदीलाल माळी यांनी केले. या वेळी मुख्याध्यापक इस्माईल पिंजारी, मुन्ना वसावे, सुभाष अहिरे, राजेंद्र मगरे, सुनील लाडे, संदीप पाटील, चंद्रकला वसावे, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.