पैश्यांच्या वादातून एकास मारहाण

By Admin | Updated: May 23, 2017 13:11 IST2017-05-23T13:11:25+5:302017-05-23T13:11:25+5:30

पैसे न दिल्याचा राग येऊन दोघांनी एकास मारहाण केल्याची घटना घडली़

Struggling with money dispute | पैश्यांच्या वादातून एकास मारहाण

पैश्यांच्या वादातून एकास मारहाण

 ऑनलाईन लोकमत

नंदुरबार,दि.23- शहादा तालुक्यातील मामाचे मोहिदे येथे पैसे न दिल्याचा राग येऊन दोघांनी एकास मारहाण केल्याची घटना घडली़ ही घटना सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली़ 
मामाचे मोहिदे येथील काशिनाथ हिरामण कोळी यांच्याकडे दिनेश लक्ष्मण कोळी व प्रभाकर लक्ष्मण कोळी (दोन्ही रा़शेवाडे ता़ शिंदखेडा जि़ धुळे) हे दोन्ही उसनवारीने पैसे मागण्यासाठी आले होत़े भाच्याचे ऑपरेशन असल्याने पैसे द्यावेत असे त्यांचे म्हणणे होत़े यावेळी काशीनाथ कोळी यांनी दोघांना पैसे नसल्याचे सांगितल़े याचा राग आल्याने दिनेश व प्रभाकर या दोघांनीही काशीनाथ कोळी यांना बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली़ यावेळी दिनेश याने त्याच्या हातातील लोखंडी सळईने मारहाण करून दुखापत केली तर प्रभाकर कोळी याने काशीनाथ कोळी यांना हाताबुक्क्यांनी मारहाण केली़ 
याबाबत काशीनाथ कोळी यांनी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दिनेश व प्रभाकर कोळी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 

Web Title: Struggling with money dispute