सारंगखेडा येथे निर्जंतुकीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:31 IST2021-04-04T04:31:26+5:302021-04-04T04:31:26+5:30

सारंगखेडा व परिसरात दररोज कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. गावाला या महामारीपासून वाचविण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन आपापल्यापरीने प्रयत्न करीत आहे. ...

Sterilization at Sarangkheda | सारंगखेडा येथे निर्जंतुकीकरण

सारंगखेडा येथे निर्जंतुकीकरण

सारंगखेडा व परिसरात दररोज कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. गावाला या महामारीपासून वाचविण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन आपापल्यापरीने प्रयत्न करीत आहे. शनिवार व रविवार हे दोन दिवस ग्रामपंचायतीने कडक जनता कर्फ्यू पाळला आहे. ग्रामपंचायतीकडून नागरिकांना मास्क वापरणे, हात साबणाने स्वच्छ धुणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे व गर्दीच्या ठिकाणी न जाणे यासंबंधी जनजागृती केली जात आहे. महिनाभरात अनेक रुग्ण दगावल्याने शासनाने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करण्यासंदर्भात ग्रामपंचायत, आरोग्य व पोलीस प्रशासन वेळोवेळी नागरिकांना आवाहन करीत आहे. नंदुरबार जि.प.चे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल व सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांनी नागरिकांना गर्दी करू नये तसेच नियमांचे पालन करण्यासंदर्भात आवाहन केले आहे. सारंगखेडाचे सरपंच पृथ्वीराज रावल व ग्रामविकास अधिकारी संजय मंडळे यांनी स्वतः संपूर्ण गाव निर्जंतुकीकरण करण्यासाठी प्रयत्न केले. ज्या नागरिकांना कोरोनाची लक्षणे आहेत त्यांनी स्वतःहून त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क साधून आपले स्वॅब तपासून घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Sterilization at Sarangkheda