शहादा तालुका काँग्रेस कमिटीतर्फे तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:31 IST2021-03-27T04:31:17+5:302021-03-27T04:31:17+5:30

केंद्र सरकारने शेतकरी विरोधी व कामगार विरोधी मंजूर केलेल्या काळ्या कायद्यांविरोधात १०० दिवसांपेक्षा जास्त काळापासून शेतकरी संघटना आंदोलन करीत ...

Statement to Tehsildar on behalf of Shahada Taluka Congress Committee | शहादा तालुका काँग्रेस कमिटीतर्फे तहसीलदारांना निवेदन

शहादा तालुका काँग्रेस कमिटीतर्फे तहसीलदारांना निवेदन

केंद्र सरकारने शेतकरी विरोधी व कामगार विरोधी मंजूर केलेल्या काळ्या कायद्यांविरोधात १०० दिवसांपेक्षा जास्त काळापासून शेतकरी संघटना आंदोलन करीत आहेत. मात्र केंद्र सरकार या आंदोलनाकडे दुर्लक्ष करीत आहे. देशात केंद्र सरकारने इंधनावर भरमसाठ करवाढ लावल्यामुळे पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसचे दर गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्य, मध्यमवर्गीय व गरीब लोकांचे जगणे कठीण झाले आहे. याविरोधात देशभरातील विविध शेतकरी संघटनांनी भारत बंदचे आवाहन केले होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष नेहमी शेतकरी, कामगार यांच्यासोबत आहे. भारत बंदला पाठींबा देण्यासाठी शहादा तालुका काँग्रेस कमिटीतर्फे शहादा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या वेळी शहादा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.सुरेश नाईक, सुनील चौधरी ॲड.चंद्रशेखर सबनीस, अल्पसंख्याकचे जिल्हाध्यक्ष हाजी मकसूद खाटीक, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.अशोक पाटील, शहादा शहर काँग्रेस अध्यक्ष अशोक मुकरंदे, माजी तालुकाध्यक्ष दिलीप गांगुर्डे, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष विकी मोरे, पं.स. सदस्य गूपसिंग पावरा, ओंकार पटले, योगेंद्र शिंदे, अ‍ॅड.राजेंद्र ठाकरे, दिवान पावरा, गजानन चव्हाण, सतीश धनगर, रायसिंग तडवी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Statement to Tehsildar on behalf of Shahada Taluka Congress Committee