नवापूर तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:31 IST2021-03-27T04:31:39+5:302021-03-27T04:31:39+5:30

देशामध्ये लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. शेतकरी व कामगार विरोधी कायद्यामुळे शेतकरी व कामगार देशोधडीला लागणार ...

Statement to Navapur Tehsildar | नवापूर तहसीलदारांना निवेदन

नवापूर तहसीलदारांना निवेदन

देशामध्ये लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. शेतकरी व कामगार विरोधी कायद्यामुळे शेतकरी व कामगार देशोधडीला लागणार आहेत. कृषी कायद्यातील तरतुदींमुळे सर्वसामान्यांना मिळणारे रेशन बंद होणार आहे. केंद्र सरकारने केलेल्या कायद्यांच्या विरोधात देशामधील शेतकरी संघटनांनी भारत बंदचे आवाहन केलेले आहे. या आंदोलनाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नवापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने पूर्णपणे पाठींबा असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर पं.स. सभापती रतीलाल कोकणी, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष जालमसिंग गावीत, पं.स. सदस्य यशोदा पाडवी, माजी नगराध्यक्ष दामू बिऱ्हाडे, माजी उपनगराध्यक्ष सोहेल बलेसरीया, भांगरपाडाचे सरपंच जयंत पाडवी, महेश रामनानी, राहुल गिरासे, राजेश कोकणी, रामा गावीत, संजय पाडवी, विनायक गावीत, बाळू गावीत, नवलसिंग गावीत, गोंजी गावीत, धीरसिंग गावीत व पदधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Statement to Navapur Tehsildar