राज्यस्तरीय फ्लोअरबॉल स्पर्धांना प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 12:14 IST2019-12-20T12:14:27+5:302019-12-20T12:14:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा क्रीडा संकुलात राज्यस्तरीय शालेय फ्लोअरबॉल स्पर्धेचे उद्घाटन नंदुरबार तालुका विधायक समितीचे उपाध्यक्ष मनोज ...

Start state level floorball events | राज्यस्तरीय फ्लोअरबॉल स्पर्धांना प्रारंभ

राज्यस्तरीय फ्लोअरबॉल स्पर्धांना प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा क्रीडा संकुलात राज्यस्तरीय शालेय फ्लोअरबॉल स्पर्धेचे उद्घाटन नंदुरबार तालुका विधायक समितीचे उपाध्यक्ष मनोज रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत महाराष्ट्रातील आठ विभागातून ३२ संघातील ४८० मुले-मुली खेळाडूंचा सहभाग आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणेअंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्या वतीने व नंदुरबार जिल्हा फ्लोअरबॉल संघटनेच्या सहकार्याने राज्यस्तरीय शालेय फ्लोअरबॉल स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आले आहे. उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, मुख्याध्यापक संघाचे सचिव प्राचार्य पुष्पेंद्र रघुवंशी, हस्ती बँकेचे चेअरमन कैलास जैन, फ्लोअरबॉल संघटनेचे राज्य सचिव रवींद्र चोथवे, भारतीय फ्लोअरबॉल फेडरेशनचे तांत्रिक चेअरमन जितेंद्रसिंग, क्रीडा अधिकारी दत्ता गडपल्लीवार, क्रीडा शिक्षक प्रा.डॉ.मयूर ठाकरे, जिल्हा सचिव जितेंद्र माळी, रवींद्र सोनवणे, जगदीश बच्छाव, राजेश्वर चौधरी आदी उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी राज्यातून नाशिक, नागपूर, लातूर, मुंबई, पुणे, अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर या आठ विभागातून ४८० मुले-मुली खेळाडू नंदुरबारात आले आहेत. या स्पर्धेतून निवड होणारे खेळाडू दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्त्व करणार आहेत. या वेळी क्रीडाधिकारी सुनंदा पाटील यांनी खेळातील सहभाग हा आपल्या वैयक्तिक जीवनाला शिस्त देतो. यासाठी कुठल्या तरी खेळात आपण सहभाग नोंदवायला हवा, असा संदेश विद्यार्थ्यांना दिला. स्पर्धेत पंच म्हणून देवेंद्र सूर्यवंशी, मयूर पाटील, सुशील दहीफळे, भरत चौधरी, जगदीश वंजारी, संजय वसावे, विशाल गावीत आदी काम पहात आहेत. सूत्रसंचालन तुषार सोनवणे तर आभार जितेंद्र माळी यांनी मानले.

Web Title: Start state level floorball events