शहाद्यात औषध फवारणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:29 IST2021-05-23T04:29:30+5:302021-05-23T04:29:30+5:30

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. मार्च व एप्रिल महिन्यांत जिल्ह्यात या महामारीने हाहाकार माजविला होता. यावर ...

Start spraying the drug in the fall | शहाद्यात औषध फवारणी सुरू

शहाद्यात औषध फवारणी सुरू

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. मार्च व एप्रिल महिन्यांत जिल्ह्यात या महामारीने हाहाकार माजविला होता. यावर नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले होते. शहादा शहर व तालुक्यात महसूल, पोलीस, आरोग्य व नगरपालिका प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेऊन नियोजन करण्यात आले होते. प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे, तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. राहुल वाघ, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत व आरोग्य विभागाने विविध उपाययोजना करीत शहर व तालुक्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले.

सद्य:स्थितीत कोरोना रुग्णांची संख्या घटली असून, शहादा शहर कोरोनामुक्त करण्यासाठी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, मुख्याधिकारी डॉ. राहुल वाघ, गटनेते मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अभिजित पाटील, नगरसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र औषध फवारणी करण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे. नगरपालिका स्वच्छता विभाग व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी औषध फवारणीचे काम करीत आहेत. बसस्थानक परिसरात मुख्य रस्त्यावर तसेच गटारी, दुकाने, टपऱ्या, टॅक्सी स्टँडच्या परिसरात फवारणी करण्यात आली. मुख्याधिकारी डॉ. राहुल वाघ, स्वच्छता निरीक्षक राजेंद्र चव्हाण हे स्वतः शहरात फिरून फवारणीबाबत माहिती घेत आहेत. कोरोनाची साखळी खंडित करावयाची असल्याने नागरिकांनी गर्दी करू नये, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून गर्दीच्या ठिकाणी उभे राहू नये, बाजारातील असलेले काम उरकून त्वरित घरी थांबावे, असे आवाहनही नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Web Title: Start spraying the drug in the fall