प्रवाशांविनाच वाजली एस.टी.ची घंटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 11:58 AM2020-05-23T11:58:11+5:302020-05-23T11:58:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार/शहादा/अक्कलकुवा : सर्वसामान्य प्रवाशांशी नाळ जुळलेल्या एस.टी.ने तब्बल ६० दिवसानंतर प्रवासी सेवा सुरू केली, परंतु कोरोनाची ...

ST bell rang without passengers | प्रवाशांविनाच वाजली एस.टी.ची घंटी

प्रवाशांविनाच वाजली एस.टी.ची घंटी

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार/शहादा/अक्कलकुवा : सर्वसामान्य प्रवाशांशी नाळ जुळलेल्या एस.टी.ने तब्बल ६० दिवसानंतर प्रवासी सेवा सुरू केली, परंतु कोरोनाची एवढी दहशत की प्रवाशांनी पहिल्याच दिवशी पाठ फिरविली. प्रवाशांच्या सेवेसाठी सकाळपासून सज्ज असलेल्या नंदुरबार, अक्कलकुवा व शहादा आगारातून प्रत्येकी दोन फेऱ्या करून दिवसभराच्या इतर फेºया रद्द केल्या गेल्या. दरम्यान, नंदुरबार बस स्थानकात बस सॅनिटायझेशन करून सेवत दाखल केली गेली.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात २२ मार्च पासून एस.टी.ची सेवा बंद करण्यात आली होती. सलग ६० दिवस प्रवासी सेवा खंडित होण्याची राज्य परिवहन विभागाची ही पहिलीच वेळ होती. लाल परीपासून दुरावलेल्या चालक, वाहकांना देखील कधी प्रवासी सेवा देवू अशी ओढ लागली होती. शासनाने रेडझोन बाहेरील भागात जिल्हाअंतर्गत बस सेवा सुरू करण्याचे निर्देश दिले आणि २२ मे पासून ही सेवा सुरू झाली. त्यासाठी दोन दिवसांपासून स्थानिक स्तरावर बस फेऱ्यांचे नियोजनही करण्यात आले. नवापूर आगाराच्या अनेक बसेस या मजुरांना घेवून राज्यातील विविध भागात गेलेल्या असल्यामुळे केवळ नंदुरबार, शहादा व अक्कलकुवा येथून ही सेवा सुरू करण्यात आली. परंतु पहिल्याच दिवशी प्रवाशांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले.
नंदुरबार आगारात सन्नाटा
प्रवासी वाहतुकीच्या काळात गजबजलेले असलेले नंदुरबार स्थानक आज ६० दिवसानंतर सुरू झाले. त्यासाठी बसस्थानकाचे आसन, फलाट संपुर्ण निर्जंतुकीकरण करण्यात आले. सकाळी आठ वाजता पहिली फेरी सुटणार होती. नवापूरसाठी बस फलाटावर उभी करण्यात आली. परंतु वेळ होऊनही प्रवासी एस.टी.मध्ये बसलेच नाही. अखेर रिकामी बस मार्गस्थ झाली. दुसºया फेरीला मात्र प्रतिसाद मिळाला. जातांना १४ तर येतांना १५ प्रवासी होते. उत्पन्न केवळ ९३५ रुपये आले. शहादासाठी सोडलेल्या फेरीत जातांना ६ तर येतांना ४ प्रवासी होते. उत्पन्न केवळ ३९५ रुपये होते. बसस्थानकात प्रवाशांची अगदी तुरळक उपस्थिती लक्षात घेता दिवसभराच्या इतर सर्व फेºया रद्द करण्यात आल्याची माहिती आगार प्रमुख मनोज पवार यांनी दिली.
कोरोनामुळे पाहुणे म्हणून कुणी येवू देत नाही, कुणी भितीपोटी बाहेरगावी जात नाही त्यामुळे सध्या तरी प्रवाशांचा प्रतिसाद फारसा राहणार नाही अशी स्थिती आहे.
शहादा : अवघी झाली एकच फेरी
शहादा आगारातून दिवसातून शहादा - अक्कलकुवा ही एकच बस फेरी झाली यातून आगाराला ४० रुपयांचे उत्पन्न मिळाले.
नियमित स्वरूपात आगारातून दिवसातून सर्वाधिक सरासरी ७५० बसफेºया होतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहादा आगार दोन महिनेपासून ठप्प होते. यातून शहादा आगाराला मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने आदेश दिल्यानंतर ५० टक्के प्रवासी वाहतूक प्रमाणे प्रति फेरी २२ प्रवासी व प्रत्येक फेरीस बसचे सॅनिटरायझीईंग व स्वच्छता करणे या नुसार दिवसभरात १६ बसफेºयांचे नियोजन करण्यात आले होते.
शहादा ते नंदुरबार, शहादा ते धडगाव, शहादा ते अक्कलकुवा या तीन मार्गावर बसफेºया होणार होत्या. मात्र प्रवासी नसल्याने व विभाग नियंत्रक धुळे विभाग यांनी बस फेºयांची संख्या कमी केल्याचा आदेशानुसार बाकी बसफेºया रद्द करण्यात आल्या. दिवसभरातून शहादा आगारातून दुपारी दोन वाजता निघालेली शहादा -अक्कलकुवा ही बस मध्ये अवघे दोनच प्रवासी होते. परत आल्यावर या फेरीने केवळ ४० रुपयांच्या व्यवसाय केला. दोन महिन्यांच्या विश्रांती नंतर ही बसफेरी चालक एस. ए. पवार व वाहक के. जे.पारधी यांनी अक्कलकुवा येथे घेऊन जात पूर्ण केली.
अक्कलकुवा : दोनच फेºया
अक्कलकुवा आगारातून तळोदामार्गे नंदुरबारसाठी एक तर मोलगीमार्गे धडगावसाठी एक अशा दोनच फेºया झाल्या.
अक्कलकुवा बस स्थानकात सकाळपासूनच प्रवाशांच्या सेवेसाठी सज्जता ठेवण्यात आली होती. सकाळी आठ वाजता नंदुरबार व धडगावसाठी फेरी सोडण्यात आली.
नंदुरबारसाठीची फेरी ही तळोदामार्गे नंदुरबार अशी होती. येवून-जावून या फेरीला अवघा १५ प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला. तर मोलगीमार्गे धडगावच्या फेरीसाठी येवून-जावून ३५ प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला. बसस्थानकातील शुकशुकाट पहाता इतर सर्व फेºया लागलीच रद्द करण्यात आल्या. वरिष्ठांकडून आदेश आल्यावर शनिवारच्या फेºयांसदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आगार प्रमुख सचिन पाटील यांनी दिली.


 

Web Title: ST bell rang without passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.