शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

सौर पॅनलमुळे मोलगीत दूरसंचार सेवा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 11:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नियमित वीज पुरवठा होत नसल्याने मोलगीतील बीएसएनएल टॉवरमधून सेवाच मिळत नव्हती, यातून बीएसएनएल टिकेचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नियमित वीज पुरवठा होत नसल्याने मोलगीतील बीएसएनएल टॉवरमधून सेवाच मिळत नव्हती, यातून बीएसएनएल टिकेचे धनी ठरले. बहुतांश कामे आॅनलाईन झाली, परंतु मोलगीत सेवेअभावी कामे होत नसल्याने तक्रारी वाढल्या. असे असतांनाच राज्यपाल कोश्यारी दौऱ्यावर आले, दरम्यान दूरसंचार सेवेबाबत प्रश्न उपस्थित झाला. त्यानुसार टॉवरसाठी स्वतंत्र सौर उर्जेचे पॅनल मजूर करीत दूसंचार सेवा सुरळीत करण्यात आली.दुर्गम भागातील प्रमुख बाजारपेठेच्या ठिकाणांपैकी मोलगी हे गाव असून तेथे तीन राज्यातील नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे तेथे सर्वच सुविधांची आवश्यकता भासत असते. परंतु सद्यस्थितीत अतिमहत्वाची ठरणारी दूरसंचार सेवाच मिळत नव्हती. त्यामुळे वारंवार नागरिकांमार्फत तक्रारी करण्यात आल्या. तर आॅनलाईन कामे रखडत असल्याने ग्रहकांमधील संतापाची तीव्रताही वाढली. दरम्यान संतप्त ग्राहकांकडून टॉवर जाळण्याची तयारीही करण्यात आली होती. काही महिन्यापासून सेवा पूर्णत: बंद पडली असतांनाच राज्यपाल कोश्यारी हे मोलगी दौºयावर आले होते.राज्यपालांच्या दौºयाच्या वेळेसही दूरसंचार विभागाची हीच परिस्थितीत तेथे पाहायला मिळाली. तर नागरिकांकडूनही याबाबत काही तक्रारी करण्यात आल्या. या तक्रारींचा आढावा घेतता असता. वीज वितरणकडून पुरेसा वीज पुरवठा होत नसल्यामुळे दूरसंचारच्या सेवेवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले. तेथील सेवेची गरज लक्षात घेत बीएसएनएलमार्फत मोलगी टॉवरसाठी स्वतंत्र सौर पॅनल मंजूर झाले. त्यामुळे मोलगीसह परिसरातील ग्राहकांना सुरळीत सेवा मिळणार असल्याची माहिती अभियंता तसेच केंद्राचे प्रभारी गिरासे यांनी दिली.४नव्याने बसविण्यात आलेल्या सौर ऊर्जा पॅनलची क्षमता तीन किलो वॅट आहे. त्यामुळे बीएसएनएल टॉवरच्या माध्यमातून पूर्ण क्षमतेने ग्राहकांना सेवा देण्यास सुरुवात झाली आहे. या टॉवरची क्षमता पाच किलो मिटरची असल्याचे सांगण्यात येत असल्याने मोलगीकर, बाजार व अन्य कामानिमित्त येणारे नागरिकांसह भगदरी, काठी, निंबीपाडा, बिजरीपाटी, साकलीउमर, बोतवा, उखिल्ली सोरासापडा बिजरीगव्हाण येथील ग्राहकांनाही या टॉवरच्या माध्यमातून सेवा मिळणार आहे.४खंडीत वीज पुरवठ्यामुळे दूसंचारच्या सेवेवर मोठा परिणाम होत होता. अपेक्षित वीज पुरवठा करण्यासाठी बीएसएनएलकडून वीज वितरणकडे वारंवार पाठपुरावा करुनही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे बीएसएनएलने स्वतंत्र सौर ऊर्जेचे पॅनल उपलब्ध करुन देण्यासाठी निती आयोगाकडे दि. ४ नोव्हेंबर २०१९ रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रस्ताव देत मागणी केली होती. प्रस्ताव दाखल केल्यानंतरही पाठपुरावा करण्यात आला. परंतु या पॅनलसाठी कुठल्याही हालचाली होतांना दिसून आल्या नाही. त्यामुळे प्रस्ताव मंजूर होण्याची कुठलीही प्रतिक्षा न करता बीएसएनएलमार्फतच स्वतंत्र पॅनल मंजूर करण्यात आले आहे.