शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
3
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
4
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
5
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
6
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
7
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
8
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
9
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
10
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
13
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
14
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
15
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
16
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
17
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
18
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
19
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
20
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

सात दिवसात पावणेसहा लाख कोंबड्या केल्या गेल्या नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:28 IST

नवापूर शहरातील २४ पोल्ट्री फॉर्ममध्ये लाखो कोंबड्या व अंडी नष्ट करण्यात आली आहे. बर्ड फ्लूग्रस्त परिसरातील पोल्ट्रीत निर्जंतुकीकरण करण्याचे ...

नवापूर शहरातील २४ पोल्ट्री फॉर्ममध्ये लाखो कोंबड्या व अंडी नष्ट करण्यात आली आहे. बर्ड फ्लूग्रस्त परिसरातील पोल्ट्रीत निर्जंतुकीकरण करण्याचे काम काही व्यावसायिकांनी सुरू केले आहे. तर काही व्यावसायिकांनी निर्जंतुकीकरणाचा कामाला अजून सुरुवात केलेली नाही पोल्ट्री फार्ममधील पडलेल्या विष्ठेत पाणी साचल्याने विष्ठा कुजते, किडे पडतात. ते खाण्यासाठी बगळे, कावळे इतर पक्षी येत असतात. त्यातून इतर पक्ष्यांना बर्ड फ्लूची लागण होऊ शकते. या संदर्भात पोल्ट्रीतील विष्ठा पडलेल्या भागामध्ये जाळीने पूर्ण बंदिस्त करणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञ म्हणतात; परंतु काही पोल्ट्रीत जाळ्या नादुरुस्त अवस्थेमध्ये दिसून आले आहेत. तेथे पक्षी शिरतात. त्यापासून धोका होऊ शकतो. प्रशासनाचे किलिंग ऑपरेशनाचे काम झाले असेल तरी योग्य उपाययोजनांबाबत पोल्ट्रीत व्यावसायिकांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे असे बोलले जात आहे.

नवापूर परिसरातील पोल्ट्रीतील लाखो कोंबड्या नष्ट करण्यात आले असेल तरी १० किलोमीटर त्रिज्येतील तालुक्यातील करंजी खुर्द, वाकीपाडा, विजापूर, लहान चिंचपाडा, एक किलोमीटरमधील गाव,जामने, जामतलाव, घोडजामने, कोठडा, काळंबा, मावचीफळी, किलवणपाडा, तीन किलोमीटर अंतरावरील गाव नांदवण, बेडकीपाडा, बंधारफळी पाच किलोमीटर अंतरावरील गाव, रायंगण, रायपूर, बोकळझर, पायरविहीर, गडद, बिलमांजरे बंधारपाडा, आमपाडा या १० किलोमीटर त्रिज्येतील गावातील देशी कोंबडी बदक व इतर पक्षी टप्प्याटप्प्याने जमा करण्यासाठी केवळ पहिल्या दिवशी ग्रामीण भागात दवंडी फिरवण्यात आली होती. पुढे ग्रामीण भागात काय करवाई होईल, याबाबत संभ्रम कायम आहे. ग्रामीण भागातील ग्रामसेवक व तलाठी यांची टीम तयार करण्यात आली होती. ग्रामीण भागात कोंबड्यांची मरतूक नाही आहे. कोंबड्या जमा व नष्ट करू नका असे सांगण्यात आले होते. तूर्त ग्रामीण भागातील पक्षी संकलनदेखील थांबण्यात आले आहे. पुढे शासन काय निर्णय घेते हे नंतरच कळले. २००६ मध्ये नवापूर शहरातील पाळीव पक्षी पोपट, कबुतर व इतर पक्षी जमा करण्यात आले होते. यंदा मात्र या पक्ष्यांबाबत काहीही कार्यवाही झाली नाही.