शहादा जायण्टस व सहेली ग्रुपतर्फे कुकलट येथे श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:21 IST2021-06-22T04:21:12+5:302021-06-22T04:21:12+5:30

पाणीटंचाई निर्मूलनासाठी डोंगर उतारावर सीसीटी खोदकाम करीत असलेल्या युवकांचे मनोबल वाढविण्यासाठी ग्रुपच्या सर्व सदस्यांनी हातात टिकस व फावडी घेऊन ...

Shramdan at Kukalat by Shahada Giants and Saheli Group | शहादा जायण्टस व सहेली ग्रुपतर्फे कुकलट येथे श्रमदान

शहादा जायण्टस व सहेली ग्रुपतर्फे कुकलट येथे श्रमदान

पाणीटंचाई निर्मूलनासाठी डोंगर उतारावर सीसीटी खोदकाम करीत असलेल्या युवकांचे मनोबल वाढविण्यासाठी ग्रुपच्या सर्व सदस्यांनी हातात टिकस व फावडी घेऊन श्रमदान केले. युवकांसोबत गावातील मुली व महिलाही सहभागी झाल्या. ग्रामपंचायतीनेही हातभार लावत जेसीबी पाठवून यावर्षी वाहून गेलेला बंधारा पूर्ववत केला. जायण्टस फेडरेशनचे माजी अध्यक्ष प्रा.आर.टी. पटेल, फेडरेशनच्या उपाध्यक्ष संगीता पाटील, सदस्य माणक चौधरी, सुभाष विठ्ठल पावरा, अशोक पावरा व सुभाष पावरा आदींनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी माजी सरपंच शिवलाल पावरा, शहादा जायण्टसचे अध्यक्ष भूषण बाविस्कर, सहेलीच्या अध्यक्ष दीपाली बाविस्कर, सचिव आशाबाई चौधरी, सचिव प्रमोद सोनार, अर्चना सोनार, ईस्माईल राजा, फिरोज राजा, सकीना राजा आदी उपस्थित होते. शेवटी श्रमदानाची प्रतिपूर्ती करण्यासाठी सर्वांनी ढोल-झांजच्या तालावर फेर धरत नाचण्याचा आनंद लुटला व गाव पाण्याच्या समस्येतून मुक्त करण्यासाठी मदतीचा हात देण्याची ग्वाही दिली. भरत पावरा, दशा पावरा, अनिल लोहार, प्रा.डॉ.एच.एम. पाटील आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते.

Web Title: Shramdan at Kukalat by Shahada Giants and Saheli Group