शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरात शिवजयंती उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:31 IST

महात्मा गांधी विद्यालय, खापर खापर, ता. अक्कलकुवा येथील महात्मा गांधी विद्यालयात छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. प्रारंभी ...

महात्मा गांधी विद्यालय, खापर

खापर, ता. अक्कलकुवा येथील महात्मा गांधी विद्यालयात छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. प्रारंभी उपमुख्याध्यापक ईश्वर वळवी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी आय.बी. वळवी, एस.एम. शिंपी, एम.बी. चव्हाण, डी.डी. वळवी, एस.व्ही. ठाकरे उपस्थित होते.

स्वामी विवेकानंद हायस्कूल, नंदुरबार

नंदुरबार येथील महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित प्राथमिक शाळा व स्वामी विवेकानंद हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मुख्याध्यापक एन.जी. भावसार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. या वेळी कोविड १९ चा वाढता प्रभाव लक्षात घेता परिसरातील नागरिकांना मास्क वापरण्याविषयी जनजागृती करण्यात आली, तसेच विना मास्क फिरणाऱ्या लोकांना मास्क वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्राथमिकच्या प्रभारी मुख्याध्यापिका नीता चौरे, ज्येष्ठ शिक्षक वाय.एस. पाटील, निंबा माळी तसेच माध्यमिकचे सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

सन्मित्र मंडळ व सावर्जनिक वाचनालय, शहादा

शहादा येथील सन्मित्र क्रीडा मंडळ व अटल बिहारी सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमानाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.

या वेळी नगरपालिका गटनेते मकरंद पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी मकरंद पाटील यांनी शिवाजी महाराजांची शिकवण सगळ्यांनी आचरणात आणण्याचे आवाहन केले. मंडळाचे अध्यक्ष ज्ञानी कुलकर्णी यांनी छत्रपती शिवाजी महाराज खरे समाजसुधारक होते, प्रजापालनकर्ते होते असे सांगितले. कार्यक्रमास संपत कोठारी, शिवपाल जांगीड, मनोज राजे, के.के. सोनार, चतुर पाटील, अजबसिंग गिरासे, रमाशंकर माळी, प्रमोद सोनार आदी उपस्थित होते. मंडळास छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा भेट दिल्याबद्दल मनोज राजे यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक ज्ञानी कुलकर्णी यांनी केले, तर आभार संपत कोठारी यांनी मानले. कार्यक्रमासाठी मनोज राजे, दीपक पवार, शिवपाल जांगिड, चतुर पाटील, अजबसिंग गिरासे यांनी परिश्रम घेतले.

माध्यमिक विद्यालय, नवापाडा

अक्कलकुवा तालुक्यातील नवापाडा येथील माध्यमिक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम झाला. या वेळी एम.एस. सामुद्रे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी पी.आर. सागर, एम.आर. कापुरे, ऐ.जे. सूर्यवंशी, किसन वळवी, आर.ए. वसावे, व्ही.डी. वंजारी, डी.यू. बागूल आदी उपस्थित होते.