शिंदे येथे उमजमाता यात्रेला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 12:57 IST2019-12-21T12:56:54+5:302019-12-21T12:57:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क लहान शहादे : जागृत देवस्थांनांपैकी एक असलेल्या शिंदे, ता.नंदुरबार येथे स्वयंभू उमजमाता यात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. ...

Shinde begins with Ujjmata Yatra | शिंदे येथे उमजमाता यात्रेला सुरुवात

शिंदे येथे उमजमाता यात्रेला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क
लहान शहादे : जागृत देवस्थांनांपैकी एक असलेल्या शिंदे, ता.नंदुरबार येथे स्वयंभू उमजमाता यात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. आठ दिवस या यात्रेसाठी ठिकठिकाणाहून व्यापारी दाखल झाले आहे.
शंभर वर्षांपूर्वी खोडसगाव व शिंदे येथील गावकऱ्यांची भक्ती पाहून उमज माता शिंदे-खोडसगाव रस्त्यावर प्रकट झाली, अशी आख्यायिका सांगितली जाते. मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून उमज मातेला मानले जाते. मनोकामना पूर्ण झाली तर भाविक यात्रेनिमित्त येथे नवस फेडत आहे. यात्रेच्या पूर्वसंध्येला ग्रामस्थांकडून गावदिवाळीचा उपक्रम राबविण्यात आला. १९ रोजी सोंगाड्यांचा तर २० रोजी तमाशा मंडळाचा कार्यक्रम घेण्यात आला. सायंकाळी मंदिरावर लाकडी घोडे चढविण्यात येत आहे. ज्या भाविकांची मनोकामना पूर्ण झाली असेल ते भाविक लाकडी घोडे बनवून वाजतगाजत मंदिरावर येऊन चढवतात. शेजारीच अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील जलदेवता मंदिर आहे. या यात्रेत विविध वस्तू विक्रेत्यांनी दुकाने थाटली असून मनोरंजनाची साधनेही यात्रेत दाखल झाली आहेत. भाविकांना सोयी सुविधा पुरविण्यासाठी ग्रामपंचायत, महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समिती, ग्रामसुरक्षा दल, विठ्ठल सेवा समिती, भजनी मंडळ, आप की जय परिवार, एकलव्य मित्र मंडळ आदींचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. तर सरपंच मंगलाबाई भिल, उपसरपंच गिरधर पटेल, शैलेश पाटील, कालुसिंग भिल, दिलीप भिल, शांताबाई पाटील, उषाबाई भिल, सोनी भिल, बायाबाई भिल, ग्रामसेवक व्ही.डी. महाले हे यात्रेकरुंसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देत आहे.

Web Title: Shinde begins with Ujjmata Yatra