शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘शिकू आनंदे’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:20 IST

मार्च २०२० पासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. शाळा बंद असल्या तरी मुलांचे शिकणे सुरु रहावे ...

मार्च २०२० पासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. शाळा बंद असल्या तरी मुलांचे शिकणे सुरु रहावे या हेतूने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत ऑनलाइन पद्धतीने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे. शाळा बंद व लॉकडाऊनमुळे शहरी भागात बहुतांश मुले ही घरातच बंदिस्त आहेत. खेळण्याच्या वयात मुले घरात बंदिस्त झाल्याने अनेक प्रकारच्या शारीरिक व मानसिक समस्या मुलांमध्ये निर्माण होऊ शकतात. या बाबींचा विचार करून परिषदेच्या सामाजिकशास्त्र व कला, क्रीडा विभागामार्फत पहिली ते आठवीच्या वर्गात अध्ययन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित दर शनिवारी ऑनलाइन पद्धतीने ‘शिकू आनंदे’ हा उपक्रम ३ जुलै २०२१ पासून राज्यभर सुरु करण्यात येणार आहे. मुलांचे शिकणे आनंददायी व्हावे, घरबसल्या मुलांचा शारीरिक व्यायाम व्हावा, मुलांनी छोट्या छोट्या कृती पहाव्यात, कराव्यात, कृती द्वारा आनंददायी पद्धतीने मुले शिकवीत हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू आहे. प्रत्येक शनिवारी सकाळी ९ ते ११ अशी कार्यक्रमाची वेळ असणार असून यामध्ये सकाळी ९ ते १० या वेळेत पहिली ते पाचवीच्या मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव विषयाच्या कृती व सकाळी १० ते ११ या वेळेत सहावी ते आठवीच्या मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव विषयाच्या कृती घेण्यात येणार आहेत. या कार्यक्रमात यू-ट्युब लिंकद्वारे विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर टेमकर यांनी उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे सर्व प्राचार्य, राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळा व विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवावी व जास्तीत जास्त विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतील याबाबत योग्य कार्यवाही करण्याचे सूचित केले आहे.