शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
अंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
4
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
5
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
6
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
7
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
8
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
9
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
10
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
11
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
12
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
13
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
14
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
15
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
16
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
17
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
19
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
20
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता कामामुळे उडणाऱ्या धुळीच्या त्रासाने शहादेकर त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 14:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरात प्रवेश करताना छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराजवळच कोळदा ते खेतिया रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरात प्रवेश करताना छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराजवळच कोळदा ते खेतिया रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. रस्त्यावर तात्पुरती पिवळी माती टाकून लहान वाहनांसाठी रस्ता रहदारीस खुला केला आहे. मात्र धुळीमुळे समोरुन येणारे वाहन दिसत नसल्याने अपघात होत आहेत. अशीच स्थिती डामरखेडा गावाजवळ असल्याने रविवारी झालेल्या अपघातात दोन जणांना प्राण गमवावा लागल्याने संबंधित ठेकेदाराविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.कोळदा ते खेतिया या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम गेल्या तीन वर्षापासून अत्यंत संथगतीने सुरू आहे. परिणामी वाहनधारकांसह रस्त्यालगतच्या गावातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता रुंदीकरण कामाला नागरिकांचा विरोध नसून त्यामुळे विकासच होणार आहे. परंतु संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक अक्षरश: या कामाला कंटाळले आहेत. या रस्त्यादरम्यान असलेल्या गावातील नागरिकांना धुळीमुळे आजारांना सामोरे जावे लागत आहे. ज्याठिकाणी पर्यायी मातीचे रस्ते तयार केले आहेत अशा रस्त्यांवर वारंवार पाणी शिंपडणे गरजेचे असताना ठेकेदाराचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे.सध्या शहादा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मुख्य प्रवेशद्वाराजवळ रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. याठिकाणीही मातीकाम सुरू असल्याने सकाळ-संध्याकाळ फिरायला जाणाºया नागरिकांसह या परिसरातील व्यावसायिकांना धुळीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.सकाळी साडेसहा वाजेच्या अगोदर व सायंकाळी पाच वाजेपासून धुळीमुळे या रस्त्यावर समोरुन येणारे वाहनच दिसत नाही. वाहनधारकांना दिवे लावून तेवढा रस्ता पार करावा लागतो. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अशीच परिस्थिती तालुक्यातील डामरखेडा गावाजवळ असून रविवारी मोटारसायकलचा अपघात होऊन दोन जणांना प्राण गमवावा लागल्याची घटना घडली. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.रस्त्याचे मातीकाम सुरू असताना ठेकेदाराने नियमानुसार त्या जागेवर दिवसातून तीनवेळा पाणी टाकणे बंधनकारक आहे. परंतु संबंधित ठेकेदाराकडून दोन-तीन दिवस पाणी मारले जात नसल्यामुळे धुळीचे प्रमाण जास्त झाले आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.