शहादा तालुक्यात वनकर्मचाऱ्यांच्या डोळ्यादेखत सात हेक्टरचे जंगल तोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:19 IST2021-07-23T04:19:47+5:302021-07-23T04:19:47+5:30

लंगडी भवानी परिसरात ७० हेक्‍टर जागेवर वनविभागाचे राखीव वनक्षेत्र आहे. या ठिकाणी ३३ कोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत खैर, साग, ...

In Shahada taluka, seven hectares of forest was cut down in front of the eyes of forest workers | शहादा तालुक्यात वनकर्मचाऱ्यांच्या डोळ्यादेखत सात हेक्टरचे जंगल तोडले

शहादा तालुक्यात वनकर्मचाऱ्यांच्या डोळ्यादेखत सात हेक्टरचे जंगल तोडले

लंगडी भवानी परिसरात ७० हेक्‍टर जागेवर वनविभागाचे राखीव वनक्षेत्र आहे. या ठिकाणी ३३ कोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत खैर, साग, आदी महत्त्वपूर्ण वृक्षांची लागवड करण्यात आली होती. रविवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या दरम्यान वनरक्षक दीपक परदेशी हे काम करत असताना अचानक दोनशे ते अडीचशे जणांचा जमाव त्यांच्या दिशेने आला. मद्याच्या नशेत असलेल्या या जमावाकडे प्राणघातक धारदार शस्त्रे होती. जमावाने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांंसमोर शस्त्रांच्या साहाय्याने वृक्षतोडीला प्रारंभ केला. पाहता पाहता सुमारे एक तासाच्या आत या जमावाने सात हेक्टर वनजमिनींवरील डेरेदार वृक्षांची कत्तल करून पळ काढला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपवनसंरक्षक कृष्णा भवर यांनी याठिकाणी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत सहायक वनसंरक्षक धनंजय पवार, वनक्षेत्रपाल रत्नपारखी, सचिन खुणे यांच्यासह अधिकारी व वनकर्मचारी उपस्थित होते.

Web Title: In Shahada taluka, seven hectares of forest was cut down in front of the eyes of forest workers