शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
अंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
4
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
5
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
6
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
7
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
8
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
9
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
10
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
11
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
12
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
13
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
14
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
15
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
16
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
17
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
19
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
20
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
Daily Top 2Weekly Top 5

सावऱ्या दिगर रस्ता प्रगतीचा मार्ग ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 12:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुड्याच्या दुर्गम भागातील तोरणमाळपासून नर्मदा काठावरील सावºया दिगर या गावापर्यंत जोडणाºया प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुड्याच्या दुर्गम भागातील तोरणमाळपासून नर्मदा काठावरील सावºया दिगर या गावापर्यंत जोडणाºया प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून होत असलेल्या ६४.२ किलोमीटर रस्त्याच्या कामाची नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी पाहणी केली. दुर्गम भागातील नागरिकांच्या विकासासाठी प्रगतीचा मार्ग ठरू पाहणाºया या रस्त्याचे काम चालू वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण होऊन हा रस्ता वाहतुकीस खुला होईल, अशी अपेक्षा त्यांनी या पाहणीनंतर व्यक्त केली.सातपुड्याच्या दुर्गम भागात दळणवळणाची सुविधा नसल्यामुळे या परिसरात राहणाºया नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. दैनंदिन वापरासाठी लागणाºया वस्तूंबरोबरच आरोग्य, शिक्षण व इतर सुविधांसाठी शहर व तालुक्याच्या ठिकाणी संपर्क साधण्याकरिता या भागातील नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन शासनाने तोरणमाळ ते झापी, फलईमार्गे सावºया दिगरपर्यंत ६४.२ किलोमीटर अंतराचा रस्ता बांधण्यासाठी परवानगी दिली होती. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून हा रस्ता तयार करण्यात येत आहे. या रस्त्यावर लहान-मोठे १३२ पूल व फरशांचे बांधकाम करण्यात येणार आहेत. त्यापैकी बहुतांश पुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.या रस्त्यापैकी आतापावेतो १२ किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे. ४० किलोमीटर रस्त्याचे मातीकाम झाले असून त्यापैकी ३० किलोमीटर रस्त्याचे खडीकरणही पूर्ण झाले आहे. मे २०२० पर्यंत यापैकी ३८ किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण होणार असून या रस्त्यावर वाहतूक सुरू होणार आहे. डिसेंबर २०२० पर्यंत संपूर्ण ६४.२ किलोमीटर रस्ता वाहतुकीसाठी खुला होणे अपेक्षित आहे.या रस्त्याच्या कामाच्या पाहणीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी भेट दिली. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे उपअभियंता एन.एस. नाईक व कनिष्ठ अभियंता सायसिंग पावरा यांनी यावेळी त्यांना कामाबाबत सविस्तर माहिती सांगितली. धडगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे व इतर अधिकारी या वेळी उपस्थित होते.