लग्नाचे अमिष दाखवून युवतीवर सात वर्ष अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 13:05 IST2020-03-07T13:05:12+5:302020-03-07T13:05:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लग्नाचे अमिष दाखवून सतत सात वर्ष युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी कुकरमुंडा (गुजरात) येथील युवकाविरुद्ध नंदुरबार ...

 Seven years of mistreatment of a young girl by displaying marriage ambitions | लग्नाचे अमिष दाखवून युवतीवर सात वर्ष अत्याचार

लग्नाचे अमिष दाखवून युवतीवर सात वर्ष अत्याचार

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लग्नाचे अमिष दाखवून सतत सात वर्ष युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी कुकरमुंडा (गुजरात) येथील युवकाविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप तिरसिंग वळवी, रा.आमोद, ता.कुकरमुंडा असे आरोपीचे नाव आहे. नंदुरबारातील हाटदरवाजा परिसरात राहणाऱ्या २७ वर्षीय युवतीला कुकरमुंडा येथील संदीप याने लग्नाचे अमिष दाखवून सात वर्ष सातत्याने अत्याचार केले. या दरम्यान युवती दोन वेळा गर्भवती देखील राहिली. तिचा गर्भपात देखील करण्यात आला. नंतर मात्र, लग्नास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने युवतीने ५ मार्च रोजी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात धाव घेत कैफियत मांडली.
युवतीच्या फिर्यादीवरून संदीप वळवी याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास महिला पोलीस उपनिरिक्षक पी.पी.थोरात करीत आहे.

Web Title:  Seven years of mistreatment of a young girl by displaying marriage ambitions