शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

विसरवाडीत आलेले सात जण क्वारंटाईन कक्षात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे बाहेर गावाहून आलेल्या सात जणांना नवापूर येथील विलगीकरण कक्षात दाखल ...

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे बाहेर गावाहून आलेल्या सात जणांना नवापूर येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. गुजरात राज्यातील अहमदाबाद आणि कल्याण येथून गावातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी हे नागरिक आले होते़कोरोनाचा संसर्ग वाढत असताना नवापुर तालुका सतर्कता आणि उपाययोजना यामुळे कोरोनामुक्त आहे़ प्रशासनाकडून काटेकोरपणे लॉकडाऊनचे पालन होत आहे़ दरम्यान विसरवाडी येथील कुंभार गल्ली परिसरात राहणारी महिला मुलासह कल्याण येथे मुलीच्या सासरी गेली होती़ लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर दोघेही तेथेच अडकून पडले होते़ परंतू मिळेल त्या वाहनातून महिला तिचा मुलगा, मुलगी, जावई आणि तीन महिन्यांची नात यांच्यासोबत गावी परत आले होते़ ही बाब ग्राम सुरक्षा दल व आशावर्कर यांच्या निर्दशनात आल्यावर त्यांनी पोलीस स्टेशन, तालुका आरोग्य अधिकारी आणि ग्रामपंचायत यांना माहिती दिली होती़ त्यानुसार बुधवारी पहाटे पाच वाजता सर्व पाच जणांना सरपंच बकाराम गावीत, ग्राम विकास अधिकारी कैलास सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्यासह कर्मचारी व ग्रामसुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करत तपासणी केली आहे़ कल्याण शहर रेड झोनमध्ये असल्या कारणाने पाचही जणांना दक्षता म्हणून नवापुर येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे़ यापूर्वी विसरवाडी येथे अहमदाबाद येथून २४ रोजी गोसावी वाड्यातील दोघे आले होते़ त्यांनाही दक्षता म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे़ लॉकडाऊनमुळे रस्ते वाहतूक बंद असताना एवढ्या लांबवर या सर्वांनी प्रवास केला कसा याबाबत चर्चा सुरु झाली आहे़सर्व सात जणांच्या प्रकृतीवर विलगीकरण कक्षात लक्ष ठेवले जात असल्याची माहिती आहे़