शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

तोरणमाळ येथे ५०० फूट खोल दरीत वाहन कोसळून सातजण ठार, २० जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 12:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राम्हणपुरी, ता.शहादा : थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ पर्यटनस्थळी खडकी जाणाऱ्या घाटात ५०० फूट खोल दरीत ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राम्हणपुरी, ता.शहादा : थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ पर्यटनस्थळी खडकी जाणाऱ्या घाटात ५०० फूट खोल दरीत मजुरांचे वाहन उलटून सातजण ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. अपघातात २० जण जखमी झाले आहेत. बचावकार्य सुरू असून जखमींना तोरणमाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. 

सातपुड्याच्या सहाव्या रांगेतील खडकी हे गाव खोल दरीत आहे. तेथे जाण्यासाठी नुकताच तोरणमाळ ते खडकी हा घाट रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्याचे अद्यापही ठिकठिकाणी काम बाकी आहे. शनिवारी सकाळी खडकीहून तोरणमाळकडे मजुर घेऊन येणारे पीकअप वाहनाच्या चालकाचे नियंत्रण तीव्र चढाव आणि वळणावर सुटले. त्यामुळे वाहन थेट ५००फूट खोल दरीत कोसळले. त्यात सातजण ठार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. २० जण जखमी झाले असून त्यांच्यावर तोरणमाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात येत आहे. बचाव कार्य सुरू असून म्हसावद पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत.