शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
3
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत
4
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
5
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
6
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
7
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
8
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
9
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
10
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
11
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
12
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
13
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
14
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
15
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
16
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
17
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
18
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
19
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
20
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
Daily Top 2Weekly Top 5

पटेल कृषी महाविद्यालयातर्फे शेतकऱ्यांसाठी चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:42 IST

प्रयोगशील व प्रगतीशील शेतकऱ्यांचा अनुभव इतर शेतकऱ्यांना व कृषी क्षेत्रात कामी यावा आणि त्यापासून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठी ...

प्रयोगशील व प्रगतीशील शेतकऱ्यांचा अनुभव इतर शेतकऱ्यांना व कृषी क्षेत्रात कामी यावा आणि त्यापासून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठी संस्थेचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी परिसंवादाचे आयोजन करण्यात येते. पिपळोद येथील प्रयोगशील शेतकरी योगेश पटेल यांना या परिसंवादासाठी प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. पटेल यांनी मिरची उत्पादनासह इतर पिकांबाबत आपले अनुभव मांडत मार्गदर्शन केले. या संकल्पनेअंतर्गत कृषी महाविद्यालयाने परिसरातील नऊ गावे दत्तक घेतले असून प्रत्येक गावात एक कृषी मित्र व एक शिक्षक पाठवून परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन व सहकार्य केले जाते. परिसंवादांमध्ये सर्व नऊ गावातील शेतकऱ्यांना एकत्रित बोलावून कृषीविषयक विविध अनुभव व विज्ञान याआधारे शेती उत्पन्न कसे वाढवावे? यासाठी मार्गदर्शन केले जाते. कृषी विकासासाठी अत्यावश्यक असणाऱ्या आधुनिक यंत्रणा तसेच शास्त्रीय पद्धती व ज्ञान याची माहिती या परिसंवादाद्वारे शेतकऱ्यांना प्राप्त होते. मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव कमलताई पाटील, समन्वयक पी.आर. पाटील, प्रा.मकरंद पाटील, प्राचार्य डॉ.पी.एल. पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.