नवापूर पालिकाचार विषय समित्यांची निवड बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 01:19 PM2020-01-15T13:19:49+5:302020-01-15T13:19:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : नवापूर पालिकेच्या चारही विषय समित्यांची निवड अविरोध पार पडली. दरम्यान सुरैय्याबी शाह यांनी उपनगराध्यक्ष ...

Selection of Navapur Ethics Committees | नवापूर पालिकाचार विषय समित्यांची निवड बिनविरोध

नवापूर पालिकाचार विषय समित्यांची निवड बिनविरोध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : नवापूर पालिकेच्या चारही विषय समित्यांची निवड अविरोध पार पडली. दरम्यान सुरैय्याबी शाह यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने या पदावरील निवड नंतर करण्यात येणार आहे.
पिठासीन अधिकारी तहसीलदार सुनिता जºहाड व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र शिंदे यांच्या उपस्थितीत विषय समिती निवड प्रक्रिया पार पडली. चारही विषय समित्यांच्या सभापती पदासाठी प्रत्येकी एक नामांकन दाखल झाले. छाननीत ते सर्व नामांकन वैध ठरल्यानंतर कुणाचीही माघार न झाल्याने सर्व सभापती अविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले. गत वर्षी शिवसेनेच्या एका सदस्यास सभापती पदाची संधी मिळाली होती. यंदा ही संधी राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली आहे.
बांधकाम समिती सभापतीपदी हारून शब्बीर खाटीक, सार्वजनिक आरोग्य सभापती पदावर राष्ट्रवादीचे खलील रज्जाक खाटीक, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीचे सभापती म्हणून रेणुका विनय गावीत तर महिला व बाल कल्याण सभापती पदी मंजु मुकेश गावीत यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासन अधिकारी सुनिता जºहाड यांनी घोषित केले.
या निवड प्रक्रियेत पालिकेचे प्रशासकीय अधिकारी अनिल सोनार, कर निरीक्षक मनोज पाटील, अशोक साबळे यांनी सहकार्य केले. विषय समित्यांचे सर्व सभापतींचा पीठासीन अधिकारी सुनिता जºहाड, नगराध्यक्षा हेमलता पाटील, मावळत्या उपनगराध्यक्षा सुरैय्याबी शहा, मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे व सर्व नगरसेवक यांनी सत्कार केला. नियोजन समिती अध्यक्ष तथा उपनगराध्यक्षा सुरैय्याबी शहा यांनी राजीनामा दिल्याने मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे राजीनामा पाठविण्यात आला असून, त्यांच्या आदेशानंतर उपनगराध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
गटनेते आशिष मावची यांच्याकडून समिती सदस्यांचे नावे दिल्यानंतर समितीची रचना जाहीर करण्यात येणार आहे.

Web Title: Selection of Navapur Ethics Committees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.