आरक्षण पाहून ते सांगू लागले आम्ही पुन्हा येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:30 IST2021-03-26T04:30:24+5:302021-03-26T04:30:24+5:30

कोरोनामुळे घरीच बसून कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी आहे. यात गर्दी होतील असे ...

Seeing the reservation, they started saying we will come again | आरक्षण पाहून ते सांगू लागले आम्ही पुन्हा येणार

आरक्षण पाहून ते सांगू लागले आम्ही पुन्हा येणार

कोरोनामुळे घरीच बसून

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी आहे. यात गर्दी होतील असे मेळावे, आंदोलने यांनाही परवानगी नाकारली जात आहे. यातून राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मात्र पंचाईत झाली आहे. काहीच कार्यक्रम नसल्याने अनेकजण घरीच आराम करीत आहेत. यातून सध्या शहरात बॅनरबाजी, आंदोलने नसल्याने नागरिकांना चुकल्यासारखे वाटत असल्याचे जाणवत आहे. शहरातील गजबजलेल्या नेहरू चाैकात दोघांचा याबाबतचा संवाद थोडा रंजक असाच होता. एकजण सोबतच्या कार्यकर्ता मित्राला म्हणाला, काय अरे आपला नेता काय दखाई नई राह्यना आजकाल, कोठे शे तो, त्यावर दुसरा म्हणाला, अरे तो ऊना ते गर्दी व्हस म्हणून घरना बाहेर नई निंघस, त्यावर दुसरा त्याला म्हणाला, तशी नई शे भो, ऊनाबी ते पेपरमा फोटो आणि बातमी येवाव नई मग घरना बाहेर निंघानं त्यामा घर बठस नेता....

Web Title: Seeing the reservation, they started saying we will come again