दुसऱ्या टप्प्याच्या सर्वेक्षणात ३३ कोरोनाबाधित आढळल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 12:52 PM2020-10-28T12:52:49+5:302020-10-28T12:53:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात आजाराची लक्षणे आढळलेल्या  २५९ व्यक्तींची कोरोना चाचणी ...

The second phase of the survey found 33 coronary arteries | दुसऱ्या टप्प्याच्या सर्वेक्षणात ३३ कोरोनाबाधित आढळल

दुसऱ्या टप्प्याच्या सर्वेक्षणात ३३ कोरोनाबाधित आढळल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात आजाराची लक्षणे आढळलेल्या  २५९ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ३३ कोरोना बाधित आढळले आहेत.  
दुसऱ्या टप्प्यातील  सर्वेक्षण केलेल्या नागरिकांपैकी सहा हजार ९१३ व्यक्तींना रक्तदाब, १०५ कर्करोग, चार हजार ९७२मधुमेह,  इतर आजार ९८९ व २१८ व्यक्तींना खोकला असल्याचे आढळून आले. २१२ व्यक्तींना ताप, १२ जणांना घसादुखी तर दोन व्यक्तींमध्ये एसपीओ-२ चे प्रमाण ९५ पेक्षा कमी आढळले. यापैकी ३५५ रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले आणि यापैकी ७३ टक्के व्यक्तींची स्वॅब चाचणी करण्यात आली. सर्वेक्षणात आरोग्य पथकांनी जिल्ह्यातील तीन लाख ६६ हजार  ७२१ घरांना भेटी दिल्या. एकूण  १८ लाख ७२हजार ७७५ लोकसंख्येपैकी १६ लाख ९५ हजार ६२५ नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. यात अक्कलकुवा दोन लाख ४७ हजार १८३, धडगाव दोन लाख ३० हजार ७०९, नंदुरबार तीन लाख ४८ हजार १६९, नवापूर  दोन लाख ८४ हजार २४३,  शहादा चार लाख नऊ हजार ८५५ आणि तळोदा तालुक्यातील एक लाख ७५ हजार ४६६ नागरिकांचा समावेश आहे.

Web Title: The second phase of the survey found 33 coronary arteries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.