शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

‘सुदृढ आरोग्या’च्या हक्कासाठी सरसावल्या शालेय विद्यार्थिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 11:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ‘माझा अधिकार आरोग्याचा, तंबाखुमुक्त परिसरा’चा या घोषणांसह देत तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणाऱ्या सर्वांचेच आरोग्य धोक्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ‘माझा अधिकार आरोग्याचा, तंबाखुमुक्त परिसरा’चा या घोषणांसह देत तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणाऱ्या सर्वांचेच आरोग्य धोक्यात आले आहे़ यामुळे तंबाखूमुक्तीसाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी शालेय विद्यार्थिनींनी केली़ मानवी हक्क दिनाचे औचित्य साधून तब्बल दहा विद्यार्थिनींच्या गटाने जिल्हाधिकारी व अधिकाºयांना निवेदन देत तंबाखुजन्य पदार्थांवर बंदीची मागणी केली़मानव अधिकार दिनाचे औचित्य साधून हि.गो.श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, जिल्हा प्राधिकरण नंदुरबारचे न्यायाधिश सतिष मुळे, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, जिल्हा शल्यचिकित्सक रघुनाथ भोये, उपशिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, शिक्षण विभाग उपनिरीक्षक दिनेश देवरे, शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत पाटील यांना निवेदन दिले़ साक्षी पाटील, उन्नती कलाल, भाग्यश्री गवळी, आर्या पाटील, मातंगी बनकर या विद्यार्थिनींनी हे निवेदन देत राज्यातील तिसरा तंबाखुमुक्त जिल्हा असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात तंबाखु जन्य पदार्थांमुळे व्यसन करणाºयांसह इतरांच्या आरोग्याला धोका पोहोचत आहे़ यातून अनेकजण सुदृढ आरोग्याचा अधिकार गमावून बसले आहेत़ मानवी हक्क दिनी त्यांना सुदृढ आरोग्य हक्क देण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यात तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालण्याची मागणी केली़मुंबई सलाम फाउंडेशनच्यावतीने हा उपक्रम राबण्यात आला़ वरिष्ठ व्यवस्थापक अजय पिळणकर, मुख्याध्यापिका सुषमा शहा यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वीतेसाठी प्रा.प्रशांत बागूल, तंबाखूमुक्त नंदुरबार जिल्हा अभियानाचे जिल्हा समन्वयक रवी गोसावी यांनी परिश्रम घेतले.विद्यार्थिनींने निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ़ भारुड यांनी संवाद साधून त्यांच्या धाडसाचे कौतूक करत मार्गदर्शन केले़