शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
5
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
6
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
7
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
9
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
10
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
11
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
12
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
13
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
14
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
15
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
16
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
17
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
18
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
19
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
20
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

शहादा तालुक्यात स्वच्छतेचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:55 IST

अवैध गुटखा विक्रीत वाढ अद्यापही कायम नंदुरबार : जिल्ह्यातील विविध भागात अवैध गुटखा वाहतूक आणि विक्रीवर कारवाई सुरु असतानाही ...

अवैध गुटखा विक्रीत वाढ अद्यापही कायम

नंदुरबार : जिल्ह्यातील विविध भागात अवैध गुटखा वाहतूक आणि विक्रीवर कारवाई सुरु असतानाही अवैध गुटखा विक्री सुुरु आहे. याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. अद्यापही अनेक भागातून चोरटी गुटखा वाहतूक सुरु आहे.

बोरद परिसरात बिबट्याचा संचार

बोरद : तळोदा तालुक्यातील बोरद व मोड परिसरात बिबट्याचा संचार आहे. यामुळे शेतीकामांवर परिणाम होत असल्याचे शेतक-यांकडून सांगण्यात येत आहे. वनविभागाने या भागात गस्त करुन बिबट्याचा संचार थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. बिबट्याच्या भितीने मजूर शेतात कामांसाठी येत नसल्याची माहिती देण्यात येत आहे. तालुक्यातील इतर भागातही बिबट्याचा संचार असल्याची माहिती देण्यात येत आहे.

मोहीम सुरु करावी

नंदुरबार : तालुक्यातील गावांमध्ये डास व मच्छरांमुळे अनेकांना किरकोळ तापाची लक्षणे असलेले आजार दिसून येत आहेत. यातून तालुक्यात सर्वेक्षण मोहिम राबवण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. पूर्व भाग तसेच तापी काठालगतच्या गावांमध्ये डास व मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

पुलाला कठडे द्या

तळोदा : शहरातील खर्डी नदीच्या पुलावर कठडे देण्याची मागणी आहे. अक्कलकुवा रस्त्याकडे जाणा-या या पुलावर रात्री अपरात्री वाहने गेल्याने अपघात होण्याची भिती आहे. यामुळे या पुलावर कठडे लावण्यात यावे अशी मागणी आहे. शहरातील विविध भागातील नागरीक या पुलांवरुन वाहतूक करतात.

बाजारपेठेत तयारीला वेग

अक्कलकुवा : यंदा सातपुड्यात होलिकोत्सव कोरोना उपाययोजनांसह होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अक्कलकुवा शहरातील व्यावसायिक विविध वस्तूंची आवक करुन घेत असल्याचे दिसून आले आहे. त्यांच्याकडून आदिवासी बांधवांसाठी लागणा-या विविध वस्तू मागवण्यात येत आहेत. तालुक्यातील विविध भागातून आदिवासी बांधव खरेदीसाठी येथे येतात.

मार्गदर्शक फलक हवे

नंदुरबार : तालुक्यातील वावद गावाजवळ पूर्व भागात जाणा-या मुख्य रस्त्यावर मार्गदर्शक फलक लावण्याची मागणी आहे. याठिकाणी गावांच्या नावासह अंतराची माहिती देणे आवश्यक आहे. तसेच तीर्थक्षेत्र शनिमांडळ असा मोठा फलक लावण्याची अपेक्षा भाविकांकडून व्यक्त होत आहे.

दुरुस्तीची मागणी

नंदुरबार : तालुक्यातील वावद ते रनाळे गावादरम्यान एक-दोन ठिकाणी रस्ता खरा असून खड्डे पडले आहेत. या ठिकाणी रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी आहे. भरधाव वेगातील वाहने ऐन वळणावर खड्ड्यात जात असल्याने अपघातांची भिती असल्याने तातडीने कारवाईची मागणी आहे.

उमर्दे ते निंबोणी रस्त्याची दुरवस्था

नंदुरबार : तालुक्यातील उमर्दे खुर्द ते निंबाेणी या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्ता दुरुस्तीबाबत सातत्याने सांगूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या मार्गाने नंदुरबारकडे येणा-यांना सर्वाधिक त्रास होत आहे. विशेष बाब म्हणजे या मार्गाने नंदुरबार आगाराची बसही येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी आहे.

भरधाव डंपरांचा त्रास

नंदुरबार : गुजरात राज्यातील वाका मार्गाने नंदुरबारकडे भरधाव वेगात येणारे व गुजरातकडे जाणा-या अवैध वाळू वाहतूक करणा-या डंपरमुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. ही वाहने थेट अंगावर येत असल्याने अडचणी वाढत आहेत. प्रशासनाने वेगवान वाहनांवर बंदी घालण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

जनजागृतीची अपेक्षा

नंदुरबार : जिल्ह्यात सध्या कोरोना लसीकरण सुरु झाले आहे. ज्येष्ठ नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले असले तरी अद्याप केवळ शहरी भागातून प्रतिसाद आहे. ग्रामीण भागात योग्य ती माहिती मिळत नसल्याने लसीकरणाने वेग पकडलेला नाही. यामुळे ग्रामीण भागात जनजागृतीची गरज आहे.