एक लाख लीटर दुधाची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 12:00 PM2019-10-14T12:00:09+5:302019-10-14T12:00:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोजागिरी पौर्णिमेच्या पाश्र्वभूमीवर शहरात एक लाख लीटर दुधाची विक्री करण्यात आली़ दोन दिवस आधी ...

Sales of one million liters of milk | एक लाख लीटर दुधाची विक्री

एक लाख लीटर दुधाची विक्री

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोजागिरी पौर्णिमेच्या पाश्र्वभूमीवर शहरात एक लाख लीटर दुधाची विक्री करण्यात आली़ दोन दिवस आधी बुकींग करण्यात येऊनही अनेकांना दुग्धटंचाईचा सामना करावा लागला़ रात्री आठ वाजेनंतर विक्रेत्यांनी ग्रामीण भागातून आवक करुन घेतल्यानंतर नागरिकांना दुध खरेदी करता आल़े 
शहरात स्नेहमेळावे, सांस्कृतिक उपक्रमांसह कौटूंबिकरित्या कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येत़े रात्री उशिरार्पयत सुरु राहणा:या या कार्यक्रमांमध्ये बासुंदी तसेच केसर, सुकामेवा मिश्रित दुग्धसेवन करण्याची पंरपरा आह़े गेल्या तीन दिवसांपासून  दुग्धव्यावसायिकांकडे अनेकांनी बुकींग करुन ठेवले होत़े यातून सकाळपासून दुधाची विक्री सुरु झाली होती़ परिणामी सायंकाळी बाहेरपुरा परिसरातील भरवाड गल्ली, गवळीवाडा या भागात दुधाची टंचाई निर्माण झाल्याचे चित्र दिसून आल़े या भागातून 10 हजार लीटर दुधाची विक्री पूर्ण झाल्यानंतरही गरज भासत असल्याने ग्रामीण भागातून दुधाची आवक करण्यात आली़ 
शहरालगत नळवे  परिसरातील  तबेल्यांमध्ये ब:यापैकी दुग्धोत्पादन होत असल्याने याठिकाणी सायंकाळी नागरिकांची गर्दी झाली होती़ खुल्या दुधासोबतच शहरात पॅकिंग दुधाची किमान 45 हजार लीटर दररोज विक्री करण्यात येत़े गुजरात राज्यातील निझर, व्यारा येथील दुधसंघाकडून शहरात तातडीने रविवारी सायंकाळी 45 हजार लीटर दुध पाठवण्यात आले होत़े हे पॅकिंग दुधही हातोहात संपल्याची माहिती शहरातील व्यावासयिक निर्मल जैन यांनी दिली़ 

दुधाला मागणी वाढली असताना पारंपरिक दुग्धव्यवसायाला यंदा घरघर लागल्याचे दिसून आल़े ढेपसह इतर पुरक वस्तूंचे दर वाढल्याने म्हशींचे पालनपोषण करणे जिकिरीचे झाल्याने अनेकांनी पशुंची विक्री केल्याचे समोर आल़े 
 

Web Title: Sales of one million liters of milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.