शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

सद्गव्हाण पूल ठरतोय वाहतुकीसाठी धोकेदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : प्रकाशा-तळोदा या मार्गावरील सद्गव्हाण पुलावर गुजरात सरकारतर्फे वर्षभरात चार वेळा दुरुस्ती करण्यात आली. मात्र ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : प्रकाशा-तळोदा या मार्गावरील सद्गव्हाण पुलावर गुजरात सरकारतर्फे वर्षभरात चार वेळा दुरुस्ती करण्यात आली. मात्र या पुलाची परिस्थिती जैसे थे आहे. पुलाच्या ज्वार्इंटचे लोखंड बाहेर आल्यामुळे वाहनांच्या टायरला फटका बसत असून, ते अपघाताला निमंत्रण देवू पाहात आहे. त्यामुळे या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी वाहनधारकांकडून होत आहे.याबाबत असे की, अंकलेश्वर-बºहाणपूर हा मार्ग महाराष्ट्र व गुजरातला जोडणारा आहे. प्रकाशा ते तळोदा या दरम्यान सद्गव्हाण हे गाव असून, या गावालगत हा पूल आहे.या पुलावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते, दररोज लहान-मोठे वाहने या रस्त्यावरून ये-जा करतात. मागील वर्षी या सद्गव्हाण पुलाची कोट्यावधी रूपये खर्च करून दुरुस्ती झाली. मात्र निकृष्ट कामामुळे या पुलाची वर्षभरात एक-दोन नव्हे तर चक्क चार वेळा दुरूस्ती करण्यात आली. एवढं करूनही मात्र आजच्या स्थितीला पुलाच्या ज्वार्इंटचे लोखंड बाहेर आले आहे. यामुळे वाहनधारकांच्या टायरचे नुकसान होत आहे.यंदाही मार्च-एप्रिलमध्ये या रस्त्याची दुरवस्था झाली. त्यानंतर ४ एप्रिल रोजी वृत्त प्रसिद्ध केल्या नंतर काम झाले. मात्र पुन्हा मे महिन्यात जैसे थे परिस्थिती झाली. यानंतर १४ मे रोजी पुन्हा दुरवस्थेबाबत वृत्त प्रकाशित केली. त्यानंतरही काम करण्यात आले. मात्र जून महिन्यात परत तीच परिस्थिती उद्भ्वली. यानंतरही ६ जून रोजी वृत्त प्रकाशीत करताच त्याची दखल घेत काम झाले. मात्र आता नोव्हेंबर महिन्यात पुन्हातीच परिस्थिती उद्भ्वल्याने या कामाची संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे नियमानुसार व दर्जेदार काम होत नसल्याने संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी देऊन कामाची गुणवत्ता तपासावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ व वाहनधारकांनी केली आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे दुर्लक्ष न करता त्वरित उपाययोजना करण्याची अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.