शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्राचा धाक दाखवून व्यापाऱ्याची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : किराणा मालाची उधारी घेऊन परतणाºया व्यापाºयावर चौघांनी हल्ला करुन रोख रक्कम लुटून नेल्याची घटना ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : किराणा मालाची उधारी घेऊन परतणाºया व्यापाºयावर चौघांनी हल्ला करुन रोख रक्कम लुटून नेल्याची घटना शनिवारी सायंकाळी अक्कलकुवा ते खापर दरम्यान घडली़ चोरट्यांनी भररस्त्यात वाहन अडवून ही लुट केल्याची एकच खळबळ उडाली आहे़अक्कलकुवा येथील व्यापारी सुनिल परशराम कुकरेजा हे शनिवारी सकाळपासून खापर परिसरात किराणा माल विक्रीच्या व्यवहारांची रक्कम वसुलीसाठी गेले होते़ वसुलीनंतर सायंकाळी ते चालक शाकिरअली मोतेबर अली सय्यद याच्यासह एमएच ३९ जे ५५२४ या वाहनाने परतत होते़ दरम्यान सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कौली गावाजवळ मागून मोटारसायकलींवर आलेल्या चौघांनी गाडी थांबवण्याचा इशारा केला़ चालक शाकिरअली यांनी वाहन थांबवल्यानंतर हातातील लाठ्या, काठ्या व धाºयाने गाडीच्या काचा फोडून दोघांनाही मारहाण केली़ दरम्यान कुकरेजा यांच्या ताब्यातील १ लाख ३८ हजार रुपये रोख असलेली पिशवी हिसकावून घेत पळ काढला़ सायंकाळी घडलेल्या प्रकाराची माहिती कुकरेजा यांनी अक्कलकुव्यात दिल्यानंतर हा प्रकार समोर आला़याप्रकरणी रात्री उशिरा सुनिल कुकरेजा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चौघा चोरट्यांविरोधात अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे़ तपास पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे करत आहेत़घटनेनंतर पोलीस उपअधिक्षक विक्रम कदम व पोलीस निरीक्षक डांगे यांनी कौली गावाजवळ भेट देत माहिती घेतली़ चारही चोरटे २० ते २५ वयोगटातील असल्याची माहिती देण्यात आली आहे़