शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
2
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
3
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
4
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
5
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
6
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
7
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
8
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
9
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
10
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
11
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
12
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
13
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
16
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
17
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
18
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
20
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता सुरक्षा सप्ताहाचा होतोय बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:06 IST

शहरातील जुनी पालिका परिसरातील मंगळबाजार,शास्त्री मार्कट, अंधारे स्टॅाप नेहरू चौक, हाटदरवाजा या मुख्य रस्त्यावर वाहनधारकांकडून वाहतूक नियमावलीचे उल्लघंन होत ...

शहरातील जुनी पालिका परिसरातील मंगळबाजार,शास्त्री मार्कट, अंधारे स्टॅाप नेहरू चौक, हाटदरवाजा या मुख्य रस्त्यावर वाहनधारकांकडून वाहतूक नियमावलीचे उल्लघंन होत आहे. रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने शहरात ठिकठिकाणी संदेश व जनजागृती करण्यात येत असतानाही वाहतूक नियमाचे सर्रास उल्लंघन होत आहे. दुचाकी,चारचाकी वाहनधारक बेदरकारपणे वाहने चालवत आहे. धावत्या वाहनावर मोबाइलवर बोेलणाऱ्यांची संख्या वाढताना दिसून येत आहेत. शाळा-महाविद्यालयातील मार्गावर भरधाव वाहने चालवणारे रोडरोमियो बेफिकिरीने दुचाकी चालवताना दिसून येत आहे. अवैध प्रवासी वाहतूक, लायसन्स न हाताळणे,नो पार्किंगमध्ये गाडी पार्किंग करणे, इंग्रजी,मराठी फॅन्सी नंबर प्लेट, काळ्या काचा वापरणे, विनाहेल्मेट दुचाकी चालवणे आदी नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून सुरक्षा सप्ताहाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येते, पंरतु वाहनधारक यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे समोर येत आहे. वाहतूक पोलिसांनी सुरक्षा सप्ताहात दंड आकारणी करूनदेखील वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे.

दरवर्षी शासनाच्या आदेशानुसार राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान जिल्हाभरात राबविण्यात येते. वाहनधारकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन व त्याविषयीच्या नियमांची सर्वसामान्यांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने मुख्य रस्ते व शाळा महाविद्यालय पोलीस प्रशासनातर्फे अभियान राबविण्यात येते. मात्र वाहनधारकांमध्ये अभियान नंतरही जनजागृती न झाल्याने शहरातील बहुसंख्य वाहनधारक वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत वाहन चालवत असल्याचे चित्र आहे. तसेच ग्रामीण भागातून शहरात खासगी वाहतूक करणारे वाहनधारक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून वाहतूक नियम पायदळी तुडवत आहेत. प्रशासनाच्या रस्ता सुरक्षा जनजागृती करण्यात येऊनही सुधारणा होत नसल्याने सर्वसामान्यामध्ये प्रश्न उपस्थित होत आहे.