शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

रापापूर ते माळखुर्द हा साडेपाच किलोमीटरचा रस्ता ठरतोय जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:20 IST

सातपुड्यातील दुर्गम भागातील अनेक गावांना धड रस्ते नाहीत. त्यामुळे स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांनंतरदेखील तेथील आदिवासींना सपाटीपर्यंत थेट डोंगर पार करून ...

सातपुड्यातील दुर्गम भागातील अनेक गावांना धड रस्ते नाहीत. त्यामुळे स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांनंतरदेखील तेथील आदिवासींना सपाटीपर्यंत थेट डोंगर पार करून पायपीट करत तालुक्याचे मुख्यालय असलेल्या तळोदा येथे यावे लागत असते. साहजिकच प्रशासनाने निदान आमच्या दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी त्यांची रास्त अपेक्षा आहे. तळोद्याहून माळ खुर्द परिसरातील साधारण १० ते १२ गाव, पाड्यांना जाण्यासाठी माळ खुर्दपर्यंत कच्चा रस्ता संबंधित प्रशासनाने तयार केला होता. रापापूरपासून माळ खुर्दपर्यंत साधारण साडेपाच किलो मीटर अंतराचा हा रस्ता आहे. शासनाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून त्याचे डांबरीकरणाचे कामही नुकतेच पूर्ण केले आहे. साधारण चार कोटी ८० लाख रुपयांचा निधी यावर खर्च करण्यात आला आहे. तथापि केवळ संरक्षक कठड्यांच्या किरकोळ कामाअभावी सदर रस्ता वाहनधारकांसाठी जीवघेणा बनला आहे.

वास्तविक हा रस्ता घाट वळणाचा आहे. या रस्त्याच्या आजूबाजूला मोठ-मोठ्या खोल दऱ्या आहेत. अशी वस्तुस्थिती असताना अजूनही संबंधित यंत्रणेने संरक्षक कठड्यांचे काम का हाती घेतले नाही, असा प्रश्न येथील वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे. तब्बल १० ते १२ पाड्यांमधील नागरिक दुचाकी, चारचाकीने येथून प्रवास करत असतात. ते जीव मुठीत धरून पुढे मार्गक्रमण करतात. विशेषत: दोन ते तीन ठिकाणचे वळणे अतिशय धोकेदायक आहेत. केव्हा गाडी फेल होऊन खोल दरीत कोसळेल याचा नेम नाही. तरीही संबंधित यंत्रणा दखल घ्यायला तयार नाही. याबाबत रहिवाशांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. विशेषत: हा रस्ता महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अस्तंबा देवस्थानाला जोडतो. साहजिकच येथील वाहतुकीची वर्दळ अधिकच वाढणार आहे. शिवाय तेथून पुढे धडगावकडे जाणाऱ्या रस्त्याचं कामदेखील सुरू आहे. त्यामुळे संरक्षक कठड्यांची कामे हाती घेण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी आहे.

रस्त्याला लागूनच सिंचन प्रकल्प

या रस्त्याला अगदी लागूनच रापापूर हा तालुक्यातील सर्वात मोठा लघू सिंचन प्रकल्प बांधला जात आहे. रस्त्याचा साधारण १० ते १२ फुटपासून पिचिंगचे काम केले आहे. त्यामुळे धरणाच्या पाण्याने रस्त्याचाही भराव खचण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तेथेदेखील संरक्षक कठडे बांधण्याची गरज आहे. मात्र संबंधित अधिकारी त्याकडेही साफ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे. या घाट रस्त्याचा कामाच्या दर्जा बाबतीतही नागरिकांनी शंका उपस्थित करून चौकशीची मागणी केली आहे. कारण निकृष्ट काम झाल्याचा आरोप केला आहे.

स्वातंत्र्याच्या ७३ वर्षानंतर आमच्या नशिबी पक्का रस्ता आता आला आहे. साहजिकच खूप आनंद झाला आहे. मात्र घाट रस्ता असल्याने या मार्गावर धोकेदायक वळणेदेखील आहेत. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन संरक्षक कठडे बांधण्याची गरज आहे. नेमके त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. संबंधित विभागाने तातडीने संरक्षक कठडे उभारावेत. - बोखा पाडवी, रहिवाशी, माळ खुर्द, ता.तळोदा