आदिवासी विद्यार्थ्यांनी मांडला रावलापाणीचा क्रांतीकारी इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 01:20 PM2020-02-16T13:20:43+5:302020-02-16T13:20:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : नर्मदा नवनिर्माण अभियानांतर्गत तालुक्यातील तºहावद पुनर्वसन येथे सुरू असलेल्या जीवन शाळांच्या बालमेळाव्यात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक ...

Revolutionary History of Rawalpani by Tribal Students | आदिवासी विद्यार्थ्यांनी मांडला रावलापाणीचा क्रांतीकारी इतिहास

आदिवासी विद्यार्थ्यांनी मांडला रावलापाणीचा क्रांतीकारी इतिहास

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : नर्मदा नवनिर्माण अभियानांतर्गत तालुक्यातील तºहावद पुनर्वसन येथे सुरू असलेल्या जीवन शाळांच्या बालमेळाव्यात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात आदिवासी क्रांतीकारकांच्या स्वातंत्र्य लढ्यावर नाटीका सादर करून रावलापाणीचा लपलेला इतिहास सांगितला. या बालकांचा हा कार्यक्रम पाहून सिनेकलाकारही भारावले होते. दरम्यान, कार्यक्रमाच्या समारोप उद्या रविवारी दुपारी पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली.
नर्मदा नवनिर्माण अभियानांतर्गत सरदार सरोवर प्रकल्पातील विस्थापितांच्या मुला-मुलींसाठी धडगाव, अक्कलकुवा तालुक्यात साधारण सात जीवन शाळा सुरू आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांचा दरवर्षी बालमेळावा घेतला जातो. यंदा तळोदा तालुक्यातील तºहावद पुनर्वसन येथे गेल्या गुरूवारपासून बालमेळावा सुरू आहे. यात साधारण ८०० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. चार दिवसीय बालमेळाव्यात विविध मैदानी स्पर्धांबरोबरच रात्री सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या या बाल मेळाव्व्यात सिने कलाकार, साहित्यिक सहभागी झाले आहेत. शुक्रवारी रात्री झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थ्यांनी आदिवासी क्रांतीकारक खाज्या नाईक, भिमा नाईक, तंट्या भिल यांच्यावर नाटके सादर केली होती. हे क्रांतीकारक भारतीय स्वातंत्र्यासाठी ब्रिटीशांशी कसे लढले याचे अप्रतिम नाट्य विद्यार्थ्यांनी सादर केले होते.
आदिवासी क्रांतीकारकांच्या या लपलेल्या इतिहासाची माहिती विद्यार्थ्यांनी नाटकातून साद केल्याने उपस्थित सिनेकलाकारदेखील भारावले होते. त्याच बरोबर अंधेरनगरी चौपट राजा हे नाटक ही विद्यार्थ्यांनी अप्रतिम उभे हूब सादर केल्यामुळे त्यास चांगलीच दाद मिळाली. हे नाटक बसविण्यासाठी ओरीसा राज्यातून खास शंकर महानंद हे कलाकार धडगावात सात दिवसापासून आले होते. विद्यार्थ्यांनी आदिवासी विवाह नृत्य, प्रसिद्ध पावा नृत्य सादर केले होते.
दरम्यान, चार दिवसापासून सुरू असलेल्या या बाल मेळाव्याचा समारोप जिल्ह्याचे पालकमंत्री अ‍ॅड.के.सी. पाडवी यांच्या उपस्थितीत रविवारी दुपारी करण्यात येणार आहे. कार्यक्रमास शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीदेखील उपस्थित राहणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Revolutionary History of Rawalpani by Tribal Students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.