माेहफुलांचा साठा व विक्रीवरील निर्बंध हटविले, आदिवासींच्या अर्थकारणाला येणार गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:32 IST2021-05-07T04:32:01+5:302021-05-07T04:32:01+5:30

मोहफूल जमा करण्याचा नमुना एफ एम ३ परवाना, खरेदी करण्याचा एफ एम ४ आणि वाहतुकीचा एफ एम ५ हे ...

Restrictions on stockpiling and sale of flowers have been lifted, speeding up the tribal economy | माेहफुलांचा साठा व विक्रीवरील निर्बंध हटविले, आदिवासींच्या अर्थकारणाला येणार गती

माेहफुलांचा साठा व विक्रीवरील निर्बंध हटविले, आदिवासींच्या अर्थकारणाला येणार गती

मोहफूल जमा करण्याचा नमुना एफ एम ३ परवाना, खरेदी करण्याचा एफ एम ४ आणि वाहतुकीचा एफ एम ५ हे परवाने आता लागणार नाहीत. माेहफुलांच्या परराज्यातून होणाऱ्या आयातीवर मात्र निर्बंध असतील, असे या शासन निर्णयात म्हटले आहे. निर्यातीसाठी मात्र एफ एम ७ परवाना आवश्यक राहील. मोहफूल साठवणूक, विक्री व व्यापार करण्यासाठी एफ एम ७ ही अनुज्ञप्ती नव्याने मंजूर करण्यावर मात्र शासनाने निर्बंध घातले आहेत. खासगी व्यक्ती या वर्षाला ५०० क्विंटल या कमाल मर्यादेत मोहफुलांचा कोटा ठेवू शकते. मोहफुलांच्या व्यापाराकरिता एफ एम २ अनुज्ञप्ती मंजूर करून घ्यावी लागेल. आदिवासी विकास संथा, महिला बचत गटांनाच ती मिळेल. अनुज्ञप्त्या मंजूर करताना मोहफुलांचा गैरवापर होणार नाही यासाठी दंडात्मक आणि फौजदारी कारवाईची तरतूदही करण्यात आली आहे.

Web Title: Restrictions on stockpiling and sale of flowers have been lifted, speeding up the tribal economy