शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
4
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
5
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
6
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
7
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
8
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
9
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
10
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
11
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
12
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
13
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
14
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
15
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
16
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
17
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
18
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
19
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
20
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

जनता कर्फ्यूला तळोद्यात प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:29 IST

नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून परिस्थिती नियंत्रणात असावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी २७ व २८ मार्च रोजी जनता कर्फ्यूचे आवाहन ...

नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून परिस्थिती नियंत्रणात असावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी २७ व २८ मार्च रोजी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. कुणीही घराबाहेर पडू नका असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. त्याला शहरातील व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवून व बाहेर न पडता या प्रतिसाद दिला. तळोदा येथील नेहमी गजबजलेला व रहदारीचे ठिकाण असलेले मुख्य बाजापेठ, स्मारक चौक, सराफ बाजार, भाजी मंडी, चिनोदा चौफुली, कॉलेज रोड, बिरसा मुंडा चौक, शहादा रोड, बसस्थानक परिसरात शुकशुकाट होता. मोती बँक ते काकशेठ गल्लीपावेतो रस्ते निर्मनुष्य होते. बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी घरातच बसणे पसंत केले. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात होता. रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीला थांबवून तो कुठे व कशासाठी जात आहे याची चौकशी केली जात होती. ग्रामीण भागातही जनता कर्फ्यूला सकारात्मक प्रतिसाद पाहायला मिळाला.

बसेस बंद

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी पुकारलेल्या या जनता कर्फ्यूमुळे तळोदा शहरातून जाणाऱ्या बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. अक्कलकुवा आगाराकडून सर्व प्रकारच्या बससेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे नियमित गजबजलेले तळोदा शहर बसस्थानक परिसरात केवळ काही बसेस उभ्या होत्या. परिणामी या भागात शुकशुकाट दिसून आला. शनिवारी सर्वच बसेस आगारात उभ्या असून कर्मचारी मुख्यालयात ठाण मांडून पुढील आदेशाची वाट पाहत आहेत.