शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
4
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
5
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
6
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
7
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
8
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
9
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
10
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
11
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
12
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
13
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
14
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
15
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
16
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
17
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
18
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
19
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात कोरोना चाचणीसाठी प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:26 IST

मार्च महिन्यात शहरासह तालुक्यात कोरोना संक्रमणाचा विस्फोट झाल्याने तसेच मृत्यूदर वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना संक्रमणाची ...

मार्च महिन्यात शहरासह तालुक्यात कोरोना संक्रमणाचा विस्फोट झाल्याने तसेच मृत्यूदर वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून शहरातील पाच ठिकाणी कोरोना चाचणी केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये चाचणी करण्याबाबत स्वयंस्फूर्तीने उत्साह निर्माण झाला असून या पाचही केंद्रांवर दिवसभरात मोठ्या संख्येने नागरिक स्वतःची चाचणी करून घेत आहेत.

या चाचणी केंद्रांवर नमुने दिल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच अहवाल प्राप्त होत आहे. ज्या रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशांना चाचणी केंद्रावरच औषधीचा पुरवठा करण्यात येत असला तरी अशा रुग्णांना होमक्वारंटाईनचा शिक्का मारण्यात यावा, त्यानंतरच त्यांना घरी उपचाराची परवानगी द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. प्रशासनातर्फे चाचण्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे आरटीपीसीआर चाचण्यांचा अहवाल त्वरित उपलब्ध करून देण्यात यावा. या चाचणी केंद्रांवर ज्या नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे अशांच्या संपर्कातील इतरांची चाचणी करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे जे बाधित रुग्ण शासकीय नियमांचे पालन करणार नाही अशांना सक्तीने क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.

दरम्यान, गेल्यावर्षी उद्‌भवलेल्या कोरोना संक्रमणाच्या तुलनेत यंदाचे संक्रमण अत्यंत घातक असल्याचे गेल्या महिन्यात सिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे, गेल्यावर्षी बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीय होती तर यंदा मार्च महिन्यात अचानक मृत्यूदर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये या चाचणी केंद्रांवर बालकांची तपासणी केली जात आहे. १० ते २० वर्षीय बालकांचा अहवाल हा पॉझिटिव्ह येत असल्याने शहर व परिसरात कोरोनाच्या नेमक्या कुठल्या स्ट्रेनचे संक्रमण सुरू आहे याबाबत उच्चस्तरीय विशेष तपासणी करण्याची गरज असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.