लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील ९ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे़ शहरात एकाच दिवसात ३९ रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढल्या आहेत़शहरातील ज्ञानदीप सोसायटीत २३ व ५७ वर्षीय पुरुष, सिंधी कॉलनीतील २२ आणि ३५ वर्षीय पुरुष, घोडापीर मोहल्ल्यातील ६५ वर्षीय महिला, एलीझानगरातील ४९ वर्षीय पुरुष, नळवा रोड भागातील परळ नगरातील ५२ तर जिल्हा रुग्णालयातील २४ आणि २५ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे़ ९ रुग्ण समोर आल्याने जिल्ह्यातील बाधितांची संख्या १५४ झाली आहे़
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}