शहरं
Join us  
Trending Stories
1
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
2
Top Marathi News LIVE Updates: आसाममध्ये पुन्हा 'हिमंत' सरकार; आज शपथविधी
3
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
4
अण्णाद्रमुक पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर?, विधानसभेत आमदारांमध्ये दोन गट; मुख्यमंत्री विजय यांना पाठिंबा देण्यावरून वाद
5
रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं
6
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
7
Video - "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
8
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
9
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
10
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; आयटी शेअर्सना मोठा फटका, सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
11
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
12
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
13
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
14
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
15
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
16
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
17
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
18
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
19
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
20
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशा येथे कोरोना रुग्ण वाढल्याने उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 13:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने ग्रामपंचायतीतर्फे विविध प्रभावी उपाययोजना करण्यात येत ...

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने ग्रामपंचायतीतर्फे विविध प्रभावी उपाययोजना करण्यात येत आहेत. गावातील व्यावसायिकांना नोटिसा देऊन शासन नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे बजावण्यात आले. मास्क न वापरणाऱ्या व विनाकारण फिरणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा ग्रामपंचायतीने दिला आहे.
कोरोनाच्या सुरुवातीच्या चार महिन्यापर्यंत प्रकाशा गावात एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नव्हता. तरीही येथे वेळोवेळी व्यापारी व ग्रामस्थांनी जनता कर्फ्यू पाळून कोरोना विषाणूला लांब ठेवले होते. मात्र १५ दिवसापूर्वी पहिला रुग्ण आढळल्यानंतर आतापर्यंत रुग्णांची संख्या १३ झाली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रकाशा येथील ग्रामपंचायतीने कंबर कसली असून उपाययोजना करण्यात येत आहेत.
गुरुवारी सकाळी सरपंच सुदाम ठाकरे, उपसरपंच भरत पाटील, ग्रामविकास अधिकारी बी.जी. पाटील, तलाठी डी.एम. चौधरी, पोलीस कर्मचारी सुनील पाडवी, ग्रामपंचायती कर्मचारी आदींनी गावात फिरून प्रत्येक दुकानदारांना नोटीस व सूचना दिली आहे. नोटिसीत म्हटले आहे की, कोरोना विषाणूचा दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत असल्याने शहादा तालुक्यात रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. आपल्या गावातही कोरोनाचे १२ रुग्ण बाधित आढळून आले आहे व दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. म्हणून सर्व व्यापारी व नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. नियमांचे पालन न केल्यास त्यांना दंडात्मक कारवाई करण्यात येईल. सर्व व्यापाºयांनी दुकानात मास्क वापरणे बंधनकारक आहे. दुकानात सॅनिटायझर ठेवणे व प्रत्येक ग्राहकास सॅनिटायझरने हात स्वच्छ करणे बंधनकारक राहील. विनामास्क आलेल्या ग्राहकाला कुठलाही माल देऊ नये. दुकानावर एका वेळी एकच ग्राहक असेल, दोन ग्राहकांमध्ये सहा फुटाचे सामाजिक अंतर ठेवणे बंधनकारक राहील. सार्वजनिक जागेवर थुंकल्यास १०० रुपये दंड व अत्यावश्यक काम नसताना फिरल्यास १०० रुपये दंड करण्यात येईल. तोंडावर मास्क किंवा रुमाल न लावल्यास ३०० रुपये दंड राहील. नियमांचे पालन न करणाºयांवर आपत्ती व्यवस्थापन काय्द्यानुसार कारवाई करून व एक हजार रुपये दंड वसूल केला जाईल, अशी सूचना प्रशासनाकडून सर्व व्यापाºयांना देण्यात आल्या असून गावातील मुख्य चौकातही ही नोटीस लावण्यात आली आहे.
प्रकाशा गावात ज्याठिकाणी पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत त्या परिसरामध्ये प्रकाशा ग्रामपंचायतीमार्फत फवारणी केली जात आहे व त्या परिसरात बॅरिकेटींग लावून ये-जा करण्यास मनाई करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीमार्फत गावात फवारणी करावी, अशी मागणी प्रकाशा ग्रामस्थांकडून होत आहे.