उर्वरित सहा अहवालही निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 12:52 IST2020-05-21T12:52:32+5:302020-05-21T12:52:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बामखेडा : शहादा तालुक्यातील बामखेडा त.त. येथील उर्वरित सहा जणांचे अहवालदेखील निगेटिव्ह आल्याने समाधान व्यक्त करण्यात ...

The remaining six reports were also negative | उर्वरित सहा अहवालही निगेटिव्ह

उर्वरित सहा अहवालही निगेटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
बामखेडा : शहादा तालुक्यातील बामखेडा त.त. येथील उर्वरित सहा जणांचे अहवालदेखील निगेटिव्ह आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील २७ लोकांना शहादा येथील मोहिदा रस्त्यावरील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. आरोग्य प्रशासनामार्फत त्यांची तपासणी करण्यात आली असून, पहिले १६ व्यक्तींच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी ११ व्यक्तींचा अहवाल हा निगेटीव्ह आल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी दिली होती. तसेच तीन डॉक्टर व दोन ड्रायव्हर असे उर्वरित सहा लोकांचे स्वॅब देण्यात आले होते. मात्र त्यांच्या रिपोर्टची प्रतिक्षा परिसरातील नागरिकांना लागून होती. तेही रिपोर्ट रात्री उशिरापर्यंत निगेटिव आल्याने ग्रामस्थानी सुटकेच्या नि:श्वास सोडला.
संबंधित व्यक्ती नाशिक येथे उपचार घेत असली तरी ती गावातूनच गेल्याने खबरदारीचा उपाय म्हणून या व्यक्तीच्या कुटुंबियांसह निकटवर्तीयांना शहादा येथील जुना मोहिदा रस्त्यावरील विलगीकरण कक्षामध्ये क्वॉरंटाईन करण्यात आले होते. त्यांच्या अहवाल दोन दिवसांपूर्वीच प्रशासनास प्राप्त झाला. आता पूर्ण १६ लोकाच्या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनासह गावकऱ्यांनीही सुटकेचा निश्वास सोडला आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित प्रशासनाच्या अधिकाºयांसह कर्मचारी बामखेडा गावाला रोज भेट देऊन आढावा घेतला जात आहे.

Web Title: The remaining six reports were also negative