रेमडेसिविरची चौकशी मुख्यमंत्र्यांनीच करावी-हिना गावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:32 IST2021-05-06T04:32:53+5:302021-05-06T04:32:53+5:30

नंदुरबार : शासनाचे एक हजार रेमडेसिविर खासगी संस्थेला देणे गैर आहे, या मतावर मी ठाम असून या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी ...

Remadesivir should be questioned by the Chief Minister himself | रेमडेसिविरची चौकशी मुख्यमंत्र्यांनीच करावी-हिना गावीत

रेमडेसिविरची चौकशी मुख्यमंत्र्यांनीच करावी-हिना गावीत

नंदुरबार : शासनाचे एक हजार रेमडेसिविर खासगी संस्थेला देणे गैर आहे, या मतावर मी ठाम असून या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी अशी मागणी खासदार डॉ. हिना गावीत यांनी पुन्हा एकदा केली आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी जिल्हाधिकारी यांच्यावरही तोफ डागली.

जिल्हाधिकारी डॅा. राजेंद्र भारूड यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे खासदार डाॅ. हिना गावीत यांच्या सर्व आरोपांना उत्तर दिले होते. त्यावर खासदार डॉ. गावीत यांनीदेखील त्याच माध्यमातून जिल्हाधिकारी यांचे सर्व दावे व मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न केले. शासनाच्या निधीतून मिळालेले रेमडेसिविर गरीब रुग्णांसाठी होते. त्यांना न देता ते खासगी संस्थेला दिले ही बाब गैरप्रकारात मोडणारी आहे. त्याची चौकशी व्हावी, मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घ्यावी या मागणीवर आपण ठाम आहोत.

ऑक्सिजनबाबतदेखील आपण वेळोवेळी मुद्दे उपस्थित केले. त्यावरदेखील जिल्हाधिकाऱ्यांना यू टर्न घ्यावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा निर्मिती, जिल्ह्यातील आरोग्याच्या सुविधा, मेडिकल कॅालेज यासाठी आमदार डॉ. विजयकुमार गावीत यांचे योगदान किती व कसे, याचाही उहापोह त्यांनी यावेळी केला.

Web Title: Remadesivir should be questioned by the Chief Minister himself