शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
2
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
3
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
4
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
5
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
6
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
7
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
8
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
9
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
10
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
11
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
12
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
13
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
14
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
15
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
16
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
17
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
18
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
19
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
20
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णांवर उपचारासाठी नातेवाईकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:31 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शहादा शहर व तालुक्यात पहिल्या लाटेपेक्षा जास्त गंभीर रुप घेतले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने सर्वत्र ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शहादा शहर व तालुक्यात पहिल्या लाटेपेक्षा जास्त गंभीर रुप घेतले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. शहरातील सर्व कोविड सेंटर फुल्ल झाल्याने रूग्णांना सुरतला पाठविण्यात येत आहे. त्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना वेळेवर रुग्णवाहिका देखील मिळत नसल्याने खासगी वाहनातून जास्तीचे पैसे देऊन रुग्णांची सोय करावी लागत आहे. शहाद्यातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा ही तुटवडा असल्याने ऑक्सिजन मिळवण्यासाठी, बेड मिळवण्यासाठी नातेवाईकांना भटकंती करावी लागत आहे. कोविड रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन आवश्यक असून ते मिळणे देखील दुरापास्त झाले आहे. चांगली आर्थिक परिस्थिती असलेले नातेवाईक पैशांची तमा न बाळगता आपल्या माणसाचा जीव वाचावा म्हणून जास्तीचा खर्च करण्याची तयारी ठेवतात. मात्र सामान्य रुग्णांचे काय, रोजंदारी करणारा माणूस कसा सुरतला जाईल, गेला तरी तेथील हाॅस्पिटलचे दीड-दोन लाख रूपयांचे बिल कसे भरेल, येथेच उपचार करायचे म्हटले तर बेड नाही, ऑक्सिजन नाही, रेमडेसिवीर इंजेक्शन नाही मग त्याने कसे जगायचे, की जगूच नये, असा संतप्त सवाल सामान्य माणसातून केला जात आहे. याबाबत प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी ही गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे. सामाजिक संस्थांनी ही अशावेळी पुढे आले पाहिजे. शेजारील गुजरात राज्यात सरकार आणि सामाजिक संस्थांनी लोकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. लसीकरणासाठी वार्डा वार्डात लसीकरण केंद्र उघडण्यात आले आहेत. लसीकरण करण्यासाठी आलेल्या नागरिकांना चहा-कॉफी बिस्किटे दिली जातात. आपल्याकडे लसीकरणासाठी तासन्‌तास थांबूनही साधे पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था होत नाही हे दुर्दैव आहे. तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लसीकरणाचा वेग वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी लसीकरण सेंटरची संख्या वाढविणे आवश्यक आहे. रेमडेसिवीर अभावी कोणाही रुग्णाचा जीव जाऊ नये? यासाठी रेमडेसिवीरचा पुरवठा वाढवणे आवश्यक आहे. बेड अभावी रुग्णांवर तालुक्याबाहेर जाण्याची पाळी येऊ नये? यासाठी सर्व कोविड रूग्णालयात बेडची, व्हेंटिलेटरची संख्या वाढविणे ही आवश्यक आहे. अशाप्रसंगी लोकप्रतिनिधींनी देखील या सर्व सोयी पुरवून नागरिकांना आश्वस्त करणे आवश्यक आहे.